|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी जिल्हा होणार ऑक्टोबरपर्यंत डिजिटल

रत्नागिरी जिल्हा होणार ऑक्टोबरपर्यंत डिजिटल 

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची माहिती

वायफायसह जिल्हय़ात 150 मोबाईल टॉवर

सर्व शाळांमध्ये ब्रॉडबँड जोडणी

अत्याधुनिक सेवांबाबत दिल्लीत लवकरच बैठक

योजनेत रायगड, सिंधुदूर्गचाही समावेश

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे तिन्ही जिल्हे ऑक्टोबरपर्यंत डिजीटल होणार असल्याची माहिती केंद्रीय उद्योग मंत्री अनंत गीते यांनी शनिवारी दिली. जिल्हय़ात मोफत वायफाय सेवेसह शाळांमध्ये ब्रॉडबँड जोडणी होणार असून जिल्हय़ात 150 मोबाईल टॉवर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्रैमासिक आढावा सभा जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री अनंत गीते व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गीते यांनी बैठकीत झालेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. कोकणात ऑक्टोंबरपर्यंत महत्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी झालेली दिसेल त्यादृष्टीने नियोजनही सुरू आहे. एकंदरीत डिजिटालाझेशन कोकणाची वाटचाल होणार आहे.

विशेष म्हणजे तीन महिन्यात या सगळय़ाचे काम पूर्ण होणार आहे. कोकणाला जास्तीत जास्त चांगल्या सेवा मिळाव्यात यादृष्टीने आम्हा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न नेहमीच असतो या विकासाभिमुख कामांची त्वरीत बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आल्याची माहितीही अनंत गीते यांनी दिली.

ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर मोबाईल नेटवर्क समस्या उद्भवते. या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हय़ात 150 टॉवर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भाग भ्रमणध्वनी व इंटरनेटशी जोडला जाणार आहे. तसेच जिल्हय़ातील दापोली, चिपळूण येथे भुयारी गटार बांधण्यात येणार आहे.

बीओटीवर स्वच्छतागृहे

रत्नागिरी जिल्हय़ात येणाऱया पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र अनेक ठिकाणी विशेषतः पर्यटनस्थळांवर स्वच्छतागृहांअभावी खूपच समस्या निर्माण होता. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आता पर्यटन क्षेत्र व अन्य महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांच्या सहकार्याने बीओटी तत्वावर स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याची माहितीही गीते यांनी दिली.

Related posts: