|Sunday, July 30, 2017
You are here: Home » Top News » युद्धासाठी तयार राहा : चीन



युद्धासाठी तयार राहा : चीन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

युद्धासाठी तयार राहा, असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनच्या लष्कराला दिले आहेत. चीन राष्ट्रपतींच्या या आदेशामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पिपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्षे पूर्ण झाल्याने चीनने लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले. चीनचा 1 ऑगस्टला आर्मी डे असतो. या आर्मी डेच्या दोन दिवस आधीच लष्करी सामर्थ्याची परेड पार पडली. यादरम्यान राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनच्या लष्कराला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात भारत-चीन युद्ध होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!