|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दळे येथील श्रृती फणसेचे बॅडमिंटन स्पर्धेत यश

दळे येथील श्रृती फणसेचे बॅडमिंटन स्पर्धेत यश 

वार्ताहर/ जैतापूर

राजापूर तालुक्यातील दळे गावातील श्रृती फणसे ही विद्यार्थिनीने अवघ्या कमी वयामध्ये उज्वल यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिने दुहेरी यश प्राप्त केले. श्रृती फणसे ही दळे गावचे पोलीस पाटील माधव फणसे यांची कन्या आहे.

श्रृतीने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद पटकावले. त्यामुळे तिने जिह्यातून बॅडमिंटन संघा स्थान मिळवले आहे. नागपूर येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली. तसेच मुलींच्या दुहेरी जोडी या बॅडमिंटन प्रकारच्या स्पर्धेमध्ये श्रृतीने जिह्यात विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मुंबई येथे होणाऱया स्पर्धेमध्ये आता ती रत्नागिरी जिह्याकडून प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी तिने बॅडमिंटन स्पर्धेसह योगासन स्पर्धेत विविध पदके जिंकली आहेत. योग विद्येवर तिचे प्रभुत्व आहे. आता तर ती जिह्याकडून  मुंबई व नागपुर येथे होणाऱया स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करणार आहे.

 तिच्या या यशाचे पालक तसेच शिक्षकांसह तिचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.