|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बुकींग केले मोबाईल…पार्सलमधून आले लक्ष्मी, कासव

बुकींग केले मोबाईल…पार्सलमधून आले लक्ष्मी, कासव 

प्रतिनिधी / बेळगाव

सॅमसंग कंपनीचा एड्ज-8 मोबाईल संच बाजारात आणला आहे. काही ठरावीक ग्राहकांना कमी किमतीत आम्ही तो मोबाईल उपलब्ध करुन देणार आहोत. त्या ठरावीक ग्राहकांमध्ये तुमचा समावेश आहे, असे सांगत भामटय़ांनी आजमनगर येथील एका युवकाला मोबाईल म्हणून लक्ष्मी, कासव व साडी पाठविली आहे. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला आहे.

आजमनगर येथील दिलावर जमादार यांच्या मोबाईलवर 3 जुलै रोजी एक कॉल आला होता. सॅमसंग कंपनीचा मोबाईल जास्तीत जास्त ज्यांनी खरेदी केला आहे तशा निवडक ग्राहकांना केवळ 3 हजार 500 रुपयांमध्ये उत्तमप्रतीचा मोबाईल संच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे भामटय़ांनी सांगितले. आपल्याला मोबाईलची गरज नाही, असे दिलावर यांनी सांगितले. तरीही भामटय़ांनी आपला प्रयत्न सोडला नाही.

एड्ज-8 मोबाईलसाठी तुमची नियुक्ती झाली आहे, असे सांगत भामटय़ांनी दुसऱयांदा दिलावर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलावर यांनी तो मोबाईल बुक केला. शुक्रवारी 29 जुलै रोजी वरळी मुंबईहून एक पार्सल आले. पोस्टमनने पार्सल देवून 3 हजार 500 रुपये घेतले. त्यानंतर दिलावर व त्यांच्या कुटुंबियांनी ते पार्सल उघडले असता त्यांना धक्का बसला.

त्या पार्सलमध्ये वास्तुसाठी वापरण्यात येणारी लक्ष्मीची छोटी मूर्ती, कासव व एक साडी होती. त्यामुळे आपण फसलो गेलो हे दिलावर यांच्या लक्षात आले. त्यानंतर दिलावर यांनी ज्या नंबरवरुन त्यांना फोन कॉल आले होते. त्या नंबरवर संपर्क साधून तक्रार केली. ही फसवणूक आहे. त्यामुळे आपण पार्सल परत पाठवतो. असे सांगितले. मात्र भामटय़ांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. ते नंबरही बंद झाले. असे प्रकार बेळगाव परिसरात नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

Related posts: