|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कक्षासाठी महापौरांना करावी लागणार तीन महिने प्रतीक्षा

कक्षासाठी महापौरांना करावी लागणार तीन महिने प्रतीक्षा 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापौर कक्षाचे नूतनीकरण करण्याची मागणी गेल्या तीन वर्षांपासून होत आहे.  मात्र याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे अखेर महापौर संज्योत बांदेकर यांनी कक्षच बदलला आहे. पण नूतनीकरणाचे काम दोन महिन्यानंतर मार्गी लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे महापौरांना तीन महिने गटनेत्यांच्या कक्षात बसून कामकाज करावे लागणार आहे.

 कक्षाच्या नूतनीकरणाचे काम होत नसल्याने अखेर महापौर कक्षाचा ताबा सोडवा लागला आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारीचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे. महापौर-उपमहापौरांचे वाहन खराब झाले असल्याने नवी वाहने खरेदी करण्यासाठी सभागृहात दोनवेळा ठराव मंजूर करण्यात आला. पण याची अंमलबजावणी तीन वर्षांनंतर करण्यात आली. तसेच महापौर कक्षाच्या नूतनीकरणाची मागणी माजी महापौर महेश नाईक यांच्या कालावधीत करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. वाहनाप्रमाणेच कक्षाच्या नूतनीकरणास महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांनी टोलवाटोलवी चालविली आहे.

महापौर कक्षामधील मॅट आणि एअर कुलर खराब झाले असल्याने बदलण्याची सूचना करण्यात आली होती. पण दुरूस्तीसाठी निधी खर्च करण्यात येत आहे. पण अलिकडेच एअरकुलरमध्ये बिघाड होवून बंद झाले. तसेच एअर कुलरमध्ये मोठा आवाज येवून शार्टसर्किट झाले होते. महापौर कक्षातील समस्यांबाबत अधिकाऱयांना सांगूनही याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे महापौर संज्योत बांदेकर यांनी कक्षाचा ताबा सोडून गटनेत्यांच्या कक्षामधून कामकाज सुरू केले आहे. पण कक्षाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कक्षाच्या नूतनीकरणासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दि. 7 ऑगस्ट रोजी निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर निविदेची प्रक्रिया पूर्ण करून कामकाजास प्रारंभ करण्यात येणार आहे. परिणामी महापौर कक्षाचे कामकाज पूर्ण होण्यास तीन महिन्याचा अवधी लागण्याची शक्मयता आहे.

Related posts: