|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्जबाजारी शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱयाची गळफास घेऊन आत्महत्या 

वार्ताहर/ जमखंडी

बँकांकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने शेतकऱयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जमखंडी तालुक्यातील कंकणवाडी येथे रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. श्रीशैल कल्लप्पा सिद्दण्णवर (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी, श्रीशैल सिद्दण्णवर यांच्या नावे कंकणवाडी येथे दोन एकर शेती आहे. मात्र सतत दुष्काळ पडल्यामुळे शेतीसाठी त्याने स्टेट बँकेच्या शाखेतून 75 हजार तर कंकणवाडी पीकेपीएसमधून 85 हजार असे कर्ज काढले होते. परंतु दुष्काळाने पाठ सोडली नसल्याने यावर्षीही पीक उत्पन्न न आल्याने कर्जफेड होऊ शकली नाही. यामुळेच त्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. अशी माहिती त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली.  

श्रीशैल याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. बागलकोट जि. पं. उपाध्यक्ष व रयत नेते मुत्ताप्पा कोमार यांनी मयत शेतकऱयाच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास पीएसआय पुंडलिक पटातर करीत आहेत.