|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » गोकुळ दुधाच्या दरात वाढ

गोकुळ दुधाच्या दरात वाढ 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

गोकुळच्या गायीच्या दुधाच्या विक्रीदरात दोन रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्या एक ऑगस्टपासून गोकुळचे नवे दर लागू होणार आहे. फक्त गायीच्या दुधाच्या विक्रीदरात वाढ केली जाणार आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल होणार नाही.

कोल्हापूरमधील गोकुळ दुधसंघाने गायीच्या दुधाज्या विक्रीदरात वाढ केली आहे. त्यामुळे उद्यापासून गोकुळ गायीच्या दुधासाठी ग्राहकांना 2 रूपये जास्त मोजावे लागतील. कोल्हपूरमध्ये सध्या गायीचे दुध 38 रूपये प्रतीलीटर विकले जाते. उद्यापासून त्याचा दर 40 रूपये होणार आहे. मुंबईतही या दुधाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे.मुंबईत गोकुळ लाईफ दुध सध्या 42 रूपयांना विकले जाते ते उद्यापासून 44 रूपयांना विकले जाणार आहे.