|Tuesday, March 20, 2018
You are here: Home » Top News » सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आठ दिवस बंद

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आठ दिवस बंद 

ऑनलाईन टीम / पुणे :

रविवारी सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे, पुन्हा दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

रविवारी संध्याकाळी सिंहगडावर जाणाऱया रस्त्यावर अचानक रस्त्यावर अचानक मोठ दरड कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणालाही हानी झाली नाही.मात्र सिंहगडावर जाणाऱया रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. ही धोकादायक दरड हटवण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. तर उंचावरील दगड काढण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. सिंहगडाच्या सुरक्षेसाठी 1 कोटी 65 लाख रूपये राज्य सरकारने मंजूर केले असले तरी गेली दोन वर्षे हे पैसे नुसतेच पडून आहेत. या पैशांचा उपयोग धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळय़ा बसवण्यासाठी होणे गरजेचे आहे.

 

Related posts: