|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स प्रथमच 32,500 च्या वर बंद

सेन्सेक्स प्रथमच 32,500 च्या वर बंद 

बीएसईचा सेन्सेक्स 205, एनएसईचा निफ्टी 63 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांपेक्षा जास्तने वधारत बंद झाले. दोन्ही प्रमुख निर्देशांकाने नवीन विक्रम स्थापन केले. निफ्टी दिवसातील व्यवहारादरम्यान 10,085 आणि सेन्सेक्स 32,546 पर्यंत पोहोचला होता. सेन्सेक्स 32,500 आणि निफ्टी 10,075 वर पहिल्यांदाच स्थिरावले.

बीएसईचा सेन्सेक्स 205 अंशाने वधारत 32,515 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 63 अंशाच्या तेजीने 10,077 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.25 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.15 टक्क्यांच्या किरकोळ तेजीने बंद झाला.

बँकिंग, वाहन, आयटी, धातू, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात चांगली खरेदी झाली. बँक निफ्टी 1.2 टक्क्यांनी मजबूत होत 25,104 वर बंद झाला. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.6 टक्के, आयटी निर्देशांक 0.5 टक्के आणि धातू निर्देशांक 1.7 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 1.4 टक्के, ऊर्जा निर्देशांक 1.2 टक्के आणि तेल आणि वायू निर्देशांक 0.9 टक्क्यांनी मजबुती आली. मात्र एफएमसीजी आणि औषध कंपन्यांच्या समभागात विक्री दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

एसबीआय, पॉवरग्रिड, ओएनजीसी, एल ऍण्ड टी, बँक ऑफ बडोदा, टाटा स्टील आणि भारती एअरटेल 4.5-2 टक्क्यांनी वधारत बंद झाले. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, ल्यूपिन, आयटीसी, येस बँक आणि सिप्ला 3.5-1.2 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात टोरेन्ट फार्मा, श्रीराम ट्रान्स्पोर्ट, सीजी कम्प्युटर, एल ऍण्ड टी फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील 5.6-2.7 टक्क्यांनी वधारले. एलआयसी हाऊसिंग, ग्लेनमार्क, सन टीव्ही, अपोलो हॉस्पिटल 4.1-2.1 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात रायसाहेब मिल्स, कन्ट्रोल प्रिन्ट, थिरुमलाई केमिकल्स, एचईजी आणि ओम मेटल्स 20-9.2 टक्क्यांनी मजबूत झाले. दीप इन्डस्ट्रीज, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट, किटेक्स गारमेन्ट्स, व्ही गार्ड इन्डस्ट्रीज आणि जेबीएफ इन्डस्ट्रीज 10.1-5.8 टक्क्यांनी घसरले.

Related posts: