|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चांदोलीतून 1600 क्युसेस विसर्ग

चांदोलीतून 1600 क्युसेस विसर्ग 

वारणावती

: चांदोली धरणाची पाणीपातळी खालावल्याने गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली वीजनिर्मिती आज सोमवार सकाळी 9.30 च्या दरम्यान पुन्हा सुरु झाली. त्यामुळे वारणा धरणातून विद्युतनिर्मिती करून सुमारे 1600 क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात होऊ लागला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे  आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. चांदोलीत सध्या पावसाचा जोर मंदावला आहे. गेल्या  24 तासात केवळ 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  5574  क्युसेस पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे  धरणातील पाणीसाठा  वाढतच आहे. धरणाची पाणी पातळी सध्या 623.5 मीटर  झाली आहे. पाणी पातळी वाढल्यामुळे वीजनिर्मितीसाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज येथील दोन्ही जनित्रे सुरू करण्यात आली. गेल्या 24 तासात 6 मिलीमीटर पावसासह एकूण  1589  मिलीमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. धरणात सध्या 30.69 टीएमसी पाणीसाठा असून धरण 89.20 टक्के भरले आहे .

. चांदोली धरणातून आज सकाळी 9.20 मिनिटांनी  वीजनिर्मिती सुरु करण्याकरीता पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग 1600 क्युसेस इतक्या प्रमाणात आहे. दरम्यान, धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी पावसाचे प्रमाण कमी असल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आलेले नाही. आरळा- शितुर व चरण- सोंडोली पुलावरून वाहतूक सुरळीत आहे.

Related posts: