|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » जयललितांचा अण्णाद्रमुक पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार ?

जयललितांचा अण्णाद्रमुक पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार ? 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

तामिळनाडूतील जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अण्णाद्रमुक एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सत्रांकडून सांगण्यात येत आहे.

अण्णद्रमुकचे लोकसभेत 37,तर राज्यसभेत 12 खासदार आहेत.खासदारांच्या संख्याबळानुसार भाजप आणि काँग्रेसनंतर अण्णद्रमुक पक्ष तिसऱया क्रमांकावर आहे.तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकने दुसऱयांदा सत्ता स्थापन केली आहे. राज्यातील विधानसभेच्या 234 जागांपैकी 130 जागा अण्णद्रमुक पक्षाकडे आहेत. बिहारमधील जेडीयू नंतर एआयएडीएमकेही एनडीएमध्ये सामील झाल्यास राज्यसभेवर सरकाला मोठा फायदा होऊ शकतो. राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना अण्णद्रमुकने पाठिंबा दिला होता. त्याचवेळी हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

 

Related posts: