|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘गुगल प्ले’ऍपचा विश्वविक्रम

‘गुगल प्ले’ऍपचा विश्वविक्रम 

ऑनलाइन टीम / मुंबई :

इंटरनेट जायंट असणाऱया गूगलच्या ‘गुगल प्ले ऍप’ने विश्वविक्रमाची नोंद केली आहे. पाच अब्ज डाऊनलोडस्चा टप्पा गूगल प्ले सर्व्हिस ऍपने पार केला आहे.

‘अँड्रॉईड पोलिस’च्या रिपोर्टनुसार, सर्वच ऍप मॅन्युअली डाऊनलोड केलेले नाहीत, तर अनेक स्मार्टफोनमध्ये बाय डिफॉलट गूगल प्ले सर्व्हिस ऍप दिले जाते. त्यामुळे पहिल्यपासूनच इन्स्टॉल असलेल्या ऍपचीही डाऊनलोड्समध्ये नोंद होते.

गूगल प्ले सर्व्हिससेबत यू टय़ूब, क्रोम, गूगल मॅप्स, जीमेल, सर्च हे ऍपही अनेक स्मार्टफोनमध्ये मोफत इन्स्टॉल करून दिले जातात. त्यामुळे बहुतांश स्मार्टफोनवर गूगलचे हे सातही ऍप असतात. मात्र, या सातमधील एवादे ऍप नसले, तरी प्ले सर्व्हिस सर्वच स्मार्टफोनमध्ये असतेच.दरम्यान, गूगलवर ‘लिप्पझन’नावाचे स्पायवेअर आले असून, यूजर्सचे टेकस्ट, मेसेजेस, व्हॅईट कॉल्स, लोकेशन डेटा आणि फोटो जप्त करते.

 

 

Related posts: