|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Automobiles » स्वदेशी बनलेली एसयूव्हीची जीप कॅम्पस लाँच

स्वदेशी बनलेली एसयूव्हीची जीप कॅम्पस लाँच 

ऑनलाइन टीम / मुंबई :

अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जीपने भारतात आपली एसयूव्ही जीप कॅपम्स लाँच केली आहे. खरेतर जीप कॅम्पस अधिकृतरित्या आधीच लॉन्च केली होती, परंतु आज याच्या किंमतीची घोषणा झाली आहे. या कारची सुरूवातीची किंमत 14.95 लाख रूपये आहे, तर टॉप मॉडेल20.65 लाख रूपयांची आहे.

विशेष म्हणजे ही एसयूव्ही भारतातच बनवली आहे. जीप कॅम्पस पाच रंगामध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मिनिमल ग्रे, एग्झॉटिक रेड, व्होकल व्हाईट, हायड्रो ब्लू आणि ब्रिलियंट ब्लॅकचा समावेश आहे. जीप कॅम्पस मल्टीएअर पेट्रोलच्या तीन व्हेरियंट आणि 7 मल्टीएअर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.यामध्ये स्पोर्ट, लॉग्निटय़ूड ऑप्शन, लिमिटेड ऑपशन, लिमिटेड ट्रान्समिशन आहे. पेट्रोल व्हेरियंटसाठी 7 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शनही आहे.

 

Related posts: