|Sunday, July 22, 2018
You are here: Home » भविष्य » राशाभविष्य

राशाभविष्य 

बुधवार   2017

येत्या 7 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण व करीदिनाचे शुभाशुभत्व

येत्या 7 ऑगस्टला नारळी पौर्णिमेला खंडग्रासह चंद्रग्रहण आहे. सर्वच राशीना त्याचे शुभाशुभ परिणाम महिन्याभरात दिसून येतील. दाते पंचांगात या चंद्रग्रहणाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, ती जिज्ञासुनी अवश्य पहावी. त्या दिवशी दुपारी एक वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत  वेध पाळावेत. लहान मुले, वयस्कर व आजारी व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाचपासून वेध पाळावेत. ग्रहण त्यादिवशी रात्री 10.52 वाजता लागेल व उत्तररात्री 12 वा. 49 मिनिटाने सुटेल. ग्रहण स्पर्शापासून मोक्षकालापर्यंत ग्रहणाचा पुण्यकाल आहे. दि. 8 ऑगस्टला पूर्ण दिवस करिदिन असून त्याचा प्रभाव दिवसभर राहील. मंगळ धनि÷ा नक्षत्रावर प्राणनाशक योगावर हा करिदिन आलेला असल्याने तो अतिशय प्रखर असतो. त्याचे अनिष्ट परिणाम अत्यंत त्रासदायक असतात. ब्रह्मांडातील सर्व अनिष्ट व घातकी शक्तींचा वास करिदिनादिवशी पृथ्वीतलावर असतो. त्यामुळे वातावरण सुतकी व अशुद्ध असते या दिवशी बाधिक ठिकाणी जाऊ नये. अनोळखी ठिकाणी अथवा अनोळखी क्यक्तींनी काही खाण्यापिण्यास दिल्यास ते स्वीकारू नये. अथवा कुणी दान वगैरे देत असेल तर ते घेऊ नये. दान देणाऱयाची सर्व पीडा व संकटे आपल्याकडे येतात व नंतर ते निस्तरणे अतिशय कठीण होते. त्यासाठी सर्व राशीच्या लोकांनी सर्व तऱहेने सांभाळून रहावे. मोठे व्यवहार सांभाळून करावेत. वाहन अपघाताची शक्मयता असल्याने वेगावर नियंत्रण ठेवावे. साध्यासुध्या किरकोळ चेष्टामस्करीचे अथवा मतभेदांचे रुपांतर गंभीर प्रकरणात होऊ शकते. करिदिनादिवशी कोणाच्याही रुपाने बाहेरील पीडा घरी शिरू शकते. ग्रहण ही नैसर्गिक घटना असली तरी त्याची प्रखरता फार असते. त्यामुळे विषाची परीक्षा पाहू नये. चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही ग्रहांची नैसर्गिक गुरुत्वाकर्षण शक्ती निरनिराळी असते. त्यातून अनेक विषारी शक्ती तयार होतात. ग्रहण काळात काही होणार नाही पण कालांतराने त्याचे शुभाशुभ परिणाम दिसू लागतात. ग्रहण हे मुळातच अशुभ मानले जाते, मग काही राशिना ते शुभ कसे ठरते? असा प्रश्न पडतो. जन्मकुंडलीत जी 12 घरे असतात त्या प्रत्येक घराला शुभाशुभत्व दिलेले असते. जगाच्या पाठीवर कोठेही गेलात तरी चंद्र सूर्य व पृथ्वी यांचाच अधिक परिणाम होत असतो, म्हणूनच चंद्र ग्रहाण व सूर्यग्रहण यांना अतिशय महत्त्व दिलेले आहे, त्याचे अनिष्ट परिणाम अत्यंत जहाल असतात. ब्रह्मांडातील सर्व अनिष्ट व घातकी शक्तींचा वास करिदिनादिवशी पृथ्वीतलावर असतो. त्यामुळे वातावरण सुतकी व अशुद्ध असते. या दिवशी बाधिक ठिकाणी जाऊ नये. मोठे व्यवहार जपून करावेत. वाहन अपघाताची शक्मयता असल्याने वेगावर नियंत्रण ठेवावे.

मेष

दशमस्थानी होत असलेले चंद्रग्रहण तुम्हाला शुभ आहे. वरी÷ मंडळी खूष राहतील. नोकरी व्यवसायात नजर लागण्यासारखे यश मिळेल. पगारवाढ तसेच अपेक्षित ठिकाणी बदली, स्थलांतर, आवडत्या क्षेत्रात कामाची संधी मिळेल. उच्च स्थान प्राप्तीचे योग होऊ शकेल. आरोग्यात सुधारणा तसेच पूर्वी झालेले गैरसमज दूर होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल.


वृषभ

भाग्यात होत असलेले चंद्रग्रहण तुम्हाला मध्यम फलदायक आहे. प्रवास, भाग्योदय हरवलेल्या व्यक्ती अथवा वस्तू सापडणे सहज म्हणून केलेल्या अर्जामुळे उत्तम नोकरी मिळणे, असे शुभ अनुभव येतील. जर कोठे पैसे अडकले असतील तर ते या महिनाभरात मिळू शकतील. कुणाकडे बाँड, कागदपत्रे वगैरे दिला असाल तर ते काढून घेण्याचा प्रयत्न करा.


मिथुन

तुम्ही कितीही हुषार असलात तरी अनवधानाने काही चुका होऊ शकतात. मन शांत ठेवूनच कामे करावी लागतील. आठव्या स्थानी होणारे चंद्रग्रहण तुम्हाला आरोग्याच्यादृष्टीने क्लेशदायक. वातावरण,पडझड, दुरुस्ती करताना नुकसान, आर्थिक हानी असे प्रकार घडू शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत काळजीचे प्रसंग.


कर्क

हौसेखातर खरेदीसाठी नवनव्या खर्चाचे प्रसंग उदभवतील. चंद्रग्रहण सातव्यास्थानी होत आहे. काही व्यक्तींच्या अती सलगीमुळे वैवाहिक जीवनात गैरसमज होतील. त्यामुळे काही बेत अथवा जागा बदलण्याचा प्रसंग येईल. या काळात महत्त्वाची कामे जपून करावीत. कुणाशीही व्यवहार करताना सत्यासत्यतेची काळजी घेतल्यास अधिक चांगले.


सिंह

सहाव्यास्थानी होत असलेले चंद्रग्रहण तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत शुभ आहे. देण्याघेण्यातून निर्माण झालेले प्रसंग तडजोडीतून मिटतील. प्रखर शत्रू असले तरी ते थंड पडतील. धनलाभाचे अनेक योग. शुभ घटनांची मांदियाळी राहील. वाईटातून चांगले करणारे हे ग्रहण आहे. प्रवास व भागीदारी व्यवसाय असेल तर सांभाळावे लागेल.


कन्या

पंचमात होत असलेले खंडग्रास चंद्रग्रहण संमिश्र फलदायक आहे. संततीच्या दृष्टीने त्रासदायक पण शत्रुनाशाच्या दृष्टीने चांगले ठरेल. पूर्वजांची एखादी कला शिकला असाल तर त्यातून फायदा होईल. मुलाबाळांच्या बाबतीत चिंतेचे प्रसंग. खsमप्रकरणे असतील तर मोठी निराशा पदरी पडेल. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. तसेच गुप्तशत्रुंच्या कारवायावर लक्ष ठेवा.


तुळ

चंद्रग्रहण तुम्हाला शुभ आहे. धनलाभ, प्रवास, कर्जफेड, नोकरी व्यवसायात यश या दृष्टीने चांगले योग, पण वास्तुदोष नातेवाईकांशी वितंडवाद व लिखाणामुळे नको ते प्रसंग येऊ शकतील. कुणाच्याही सांगण्यावरून वास्तुत काही फेरबदल करू नका. तसेच नको ती अडगळ असेल तर ती काढा सर्व पीडा दूर होतील.


वृश्चिक

कर्जासाठी प्रयत्न केला असेल तर या सप्ताहात कर्ज घेऊ नका. आपली काही येणी व वसुली येत जातील. नोकरी व्यवसायात वरि÷ांशी हुज्जत घालू नका. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक व वडिलधाऱयांशी सल्लामसलतीने घ्या. 2 ऑगस्ट रोजी काही तरी वस्तू खरेदी करून आपल्या जवळ ठेवा. अतिजवळच्या व्यक्तिवर जास्त विश्वास ठेऊ नका. अतिविश्वासामुळे फसगत व शत्रुत्व वाढण्याची शक्मयता. प्रकृतीची काळजी घ्या. छोटे मोठे आजार डोके वर काढू लागतील. काटकसरही तुमच्या भावी  जीवनास मोठा फायदा करून देईल.


धनु

चंद्रग्रहण तुम्हाला संमिश्र फळ देणारे आहे. आर्थिक बाबतीत त्रासदायक अनुभव येतील. नको त्या कामाची जबाबदारी पडेल. शेजारी व नातेवाईकांच्या वागण्यात फरक जाणवेल. त्याचबरोबर हातून निसटलेली एखादी महत्त्वाची संधी पुन्हा मिळण्याचे योग. शनि बारावा आहे. कामात संथपणा निर्माण होईल. कार्यक्षमता वाढवा त्याचा पुढे फायदा होईल.

मकर

तुमच्या राशीतच होणारे चंद्रग्रहण मानसिक स्थिती चंचल ठेवील. कोणताही ठाम निर्णय घेणे कठीण होईल. तुम्हाला अत्यंत अशुभ आहे. आरोग्य, मानसिक स्थिती व प्रति÷sवर परिणाम करणारे हे ग्रहण तुम्हाला जरा त्रासदायक ठरेल. त्यासाठी सर्व बाबतीत सावध राहणे तुम्हाला हितावह ठरेल. आर्थिक व्यवहारात घोटाळे होण्याची शक्मयता.

कुंभ

बाराव्या स्थानी होत असलेले चंद्रग्रहण अशुभ योगात आहे. पडझड, आर्थिक हानी, बदनामी, प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारे तसेच गुप्त शत्रुपीडा वाढविणारे आहे. सर्व बाबतीत सावध राहिलात तर काहीही त्रास होणार नाही. आर्थिक शारीरिक व कौटुंबिक बाबतीत शुभ अनुभव येतील.

मीन

लाभात होत असलेले चंद्रग्रहण शुभ फळ देणारे आहे. आर्थिक सुधारणा मित्र मंडळींचे सहकार्य तसेच प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या कामात उत्तम यश मिळेल. काही गैरसमज असतील तर त्याला पूर्णविराम मिळेल. काहीजण तुमच्या स्वभावाचा व ओळखीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. यामुळे कुणाच्याही बोलण्यावर एकदम विश्वास ठेवू नका.

Related posts: