|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पत्रकारांच्या योजना लवकर पूर्ण करणार

पत्रकारांच्या योजना लवकर पूर्ण करणार 

प्रतिनिधी/ पणजी

 पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याने सरकार त्यांच्यासाठी अनेक योजना राबवित आहे. काही योजना सुरु केल्या आहेत तर काही योजना अंमलात आणण्यासाठी वेळ लागला आहे. या सर्व योजना पत्रकारांना मिळाव्या यासाठी येत्या सप्टेंबर पासून या योजनांच लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. असा दिलासा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला. लोकमान्य टिळक जयंती निमित्त मंगळवारी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

पत्रकार हे समाजासाठी काम करत असतात त्यामुळे त्यांच्या भविष्याचा विचार करुन सरकारने पेन्शन व अन्य योजना सुरु केल्या आहेत. आता सध्या आचारसंहिता असल्याने सरकारी योजनांवर लक्ष घालायला मिळत नाही. आता आणखी योजना पत्रकारांसाठी केल्या जाणार आहे. याचा विचार सरकारतर्फे सुरु आहे. या योजनांमुळे पत्रकारांचे भविष्य लाभदायक ठरणार आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

 पत्रकारांनी सरकारचे चांगले कामही प्रसिद्ध करावे

पत्रकार अनेक वेळा सरकारच्या विरोधात बातम्या लिहीत असतात. पण अशा वेळी जनतेला सरकारचे काम कसे चालते याची माहिती मिळते. या चुका सरकारला सुधारायल मिळतात. या बातम्यामुळे सरकारमधील त्रुटी लक्षात येतात व त्या दुरूस्त करायला मिळतात. ज्या प्रमाणे सरकारच्या त्रुटी दाखविल्या जातात त्याचप्रमाणे सरकारचे चांगले कार्यही पत्रकारांनी प्रसिद्ध करावे व सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

व्यासपीठावर गूज अध्यक्ष किशोर नाईक गावकर व सचिव जेराल्ड डिसोझा उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यंक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.