|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » लवकरच पेटीएमची मेसेजिंग सेवा

लवकरच पेटीएमची मेसेजिंग सेवा 

ऑनलाइन टीम / मुंबई :

सेशल नेटवर्किंगमध्ये सर्वात जास्त वापरात असलेल्या व्हॉट्स ऍपला टक्कर देण्यासाठी आता पेटीएमदेखील लवकरच मेसेजिंग ऍप सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पेटीएम यूर्झरना चॅट करण्याची सुविधा एका नवीन फीचरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सोबतच म्युझिक, फोटा, व्हिडिओ शेअर करण्याचीही सोय असेल. पेटीएमच्या प्रवक्त्यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कंपनी या फीचरवर काम करत असल्याची माहिती आहे. व्हॉट्सऍप डिजीटर पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना पेटीएमने हे पाऊल उचलले आहे. नोटाबंदीनंतर ईपेमेंटमध्ये वाढ झाली होती ज्यात पेटीएम ऍपच्या मदतीने अनेकांनी ऑनलाईन ट्राझॉक्शन केले होते. यामुळे हे ऍप चांगलेच प्रकाश झोतात आले होते.

 

Related posts: