|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Automobiles » ‘बाईक ऍम्ब्यूलन्स’ मुंबईकरांच्या मदतीला धावणार

‘बाईक ऍम्ब्यूलन्स’ मुंबईकरांच्या मदतीला धावणार 

ऑनलाइन टीम / मुंबई :

भल्या मोठय़ा टाफिकच्या गर्दीत सायरन वाजवत असलेली ऍम्ब्यूलन्स व्हॅन बऱयाच वेळा पहायला मिळते. मात्र आता रस्त्यांवर ‘बाईक ऍम्ब्युलन्स’पहायला मिळणार आहे. ही बाईक ऍम्ब्यूलन्स लवकरच मुंबईकरांच्या मदतीला धावणार आहे .

 आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकारने बाईक ऍम्ब्यूलन्स सुरू केली आहे. प्रथोमपचारासाठी जे जे आवश्यक असेल, ते सर्व साहित्य या बाईक ऍम्ब्यूलन्शमध्ये असेल. महत्त्वाचे म्हणजे या बाईक ऍम्ब्यूलन्सवर एक प्रशिक्षित पॅरामेडिक -डॉक्टर असणार आहे. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकपाठोपाठ ‘बाईक ऍम्ब्यूलन्स’सुरू करणारे महाराष्ट्र चौथे राज्य ठरले आहे. सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर बाईक ऍम्ब्यूलन्स सुरू करण्यात आली आहे. त्यांनतर राज्यातील अन्य शहरांतही ‘बाईक ऍम्ब्यूलन्स’ सुरू करण्यात येतील, असे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितले.

 

 

Related posts: