|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » मुंबई विद्यापीठाच्या 39विषयांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या 39विषयांचे निकाल जाहीर 

ऑनलाइन टीम / मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरू असताना मुंबई विद्यापिठाकडून आणखी 39विषयांचे निकाल आज जाहीर केले आहेत. परंतु अजूनही 255 विषयांचे निकाल लागणे शिल्लक आहे.

आतापर्यंत 222 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये कला शाखेचे 102 तंत्रज्ञाान शाखेचे 80, विज्ञान शाखेचे 17, व्यवस्थापनचे 17 आणि वणिज्य शाखेच्या 6 निकालांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठातील 1 हजार 719 शिक्षकांनी बुधवारी 26 हजार 169 पेपर तपासले आहेत. अजून 2 लाख 70 हजार 834 उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्यामुळे 31 जुलैची डेडलाईन हुकल्यानंतर मुंबई विद्यापीठ 5 ऑगस्टची दुसरी डेडलाईन पाळण्याबाबतही शंका आहे.