|Sunday, July 22, 2018
You are here: Home » Top News » पुण्यात 6 ऑगस्टला मराठा मोर्चा दुचाकी रॅली

पुण्यात 6 ऑगस्टला मराठा मोर्चा दुचाकी रॅली 

पुणे / प्रतिनिधी :

मुंबईत 9 ऑगस्टला काढण्यात येणाऱया मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाज (पुणे जिल्हा) च्या वतीने 6 ऑगस्टला पुण्यात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये दिली.

 ही रॅली रविवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सुरु करण्यात येणार आहे.  त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तिचा समोराप भिडे पुलाजवळील नदीपात्रात करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत निघालेल्या विविध दुचाकी रॅलीचा ही रॅली उच्चांक मोडेल, असा विश्वासही संयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

 या रॅलीमध्ये शहरातील युवक, युवती, महिला, पुरुष, वृध्द, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते असे सर्व मराठा समाजाचे बांधव सहभागी होत ‘चलो मुंबई’चा नारा देणार आहेत. कोपर्डी घटनेप्रकरणी शासनाने तात्काळ जलद गतीने खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा आरक्षण, शेतकऱयांना न्याय, शिवस्मारकाचे तात्काळ काम सुरु करावे, ऍट्रोसिटी कायद्यामध्ये दुरुस्ती आदी मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रासह देशभर व बाहेरील देशांमध्ये मराठा समाजाने एकूण 57 आदर्शवत मोर्चे काढले आहेत. या मागण्यांना वर्षभरामध्ये न्याय न मिळाल्याने मराठा समाज हा अधिक तीव्र झाला आहे.

 मुंबईतील महामोर्चाची जनजागृती महाराष्ट्राबरोबर पुणे जिह्यातही जोरात चालू आहे. मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये जी शिस्त पहावयास मिळाली होती, तीच शिस्त दुचाकी रॅलीमध्ये पाहावसाय मिळेल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

 

Related posts: