|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात सोन्याच्या मागणीत वाढ

भारतात सोन्याच्या मागणीत वाढ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या मागणीमध्ये घसरण होत आहे. मात्र भारतात त्याच्या विरोधी वातावरण आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, 2017 च्या एप्रिल-जून तिमाहीदरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या मागणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी घसरण झाली. भारतात सोन्याची मागणी 37 टक्क्यांनी वाढत 167.4 टनावर पोहोचली आहे. भारतात सोन्याच्या दागिन्यांची मागणी 41 टक्क्यांनी वाढत 126.7 टनावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 122.1 टन मागणी होती. भारतात सोन्याची मागणी वाढण्यासाठी मुख्य कारण हंगाम आणि ग्रामीण भागातून वाढती मागणी असल्याचे म्हणण्यात आले.

भारतात सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढण्याचे प्रमुख कारण जीएसटी असल्याचे सांगण्यात येते. देशात सोन्याची मागणी वाढली असली तर पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ती कमी आहे. गेल्या वर्षी दुसऱया तिमाहीत 89.8 टन सोन्याची मागणी झाली होती. त्यावेळी अबकारी कराचा विरोध करत बंद पुकारण्यात आल्याने त्याचा परिणाम विक्रीवर दिसून आला होता.

 

 

 

Related posts: