|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » एसबीआयकडून तत्काळ हस्तांतरणाच्या मर्यादेत वाढ

एसबीआयकडून तत्काळ हस्तांतरणाच्या मर्यादेत वाढ 

मुंबई / वृत्तसंस्था :

एसबीआयकडून खातेदारांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. बँकेने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे पाठविण्याच्या मर्यादेत अडीच पटींनी वाढ केली आहे. एसबीआयनुसार, आता क्विक ट्रान्सफर सेवेने समोरच्या व्यक्तीला आपल्या खात्याशी जोडल्याशिवाय एका दिवसात 25 हजार रुपये पाठविता येईल. पहिल्यांदा ही मर्यादा 10 हजार रुपयांची होती. नेट बँकिंगमध्ये एनईएफटी, आयटीजीएस, आयएमपीएस या माध्यमातून पैसे पाठविण्यासाठी पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीला आपल्या खात्याशी जोडावे लागत होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन-तीन तास ते एका दिवसांपर्यंत कालावधीत लागत असे.

एसबीआयने क्विक ट्रान्सफर सेवेच्या माध्यमातून एकाच वेळी पैसे पाठविण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे. सध्या 5 हजार रुपयांची असणारी ही मर्यादा 10 हजार रुपयांवर करण्यात आली आहे. क्विक ट्रान्सफर सेवेच्या मदतीने समोरच्या खातेदाराला आपल्या खात्याला जोडल्याशिवाय पैसे पाठविता येईल. यासाठी समोरच्या व्यक्तीचे खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड यांची जरुरत असते. याव्यतिरिक्त अन्य माहितीची गरज भासणार नाही. याव्यतिरिक्त एसबीआयच्या ग्राहकाने दुसऱया स्टेट बँकेच्या खात्यात पैसे पाठविल्यास शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र अन्य बँकांसाठी सशुल्क सेवा आहे.