|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिक्षक समायोजन प्रक्रियेला स्थगिती

शिक्षक समायोजन प्रक्रियेला स्थगिती 

ओरोस प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेले मुख्याध्यापकपद संरक्षित झाल्याने त्या शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकाला अतिरिक्त ठरवून समायोजित करण्याच्या प्रक्रियेला जि. . मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी स्थगिती दिली आहे.

 प्राथमिक शाळांमधील सुमारे 400 मुख्याध्यापकपदे अतिरिक्त ठरली आहेत. या पदांना सेवानिवृत्तीपर्यंत न्यायालयाने संरक्षण दिले आहे. न्यायालयीन आदेशानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हय़ात मुख्याध्यापकानंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकाला अतिरिक्त ठरवून त्यांचे समायोजन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार जि. .
प्राथमिक शिक्षण विभागाने तालुकास्तरावर समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

 तालुकास्तरावर सुरू करण्यात आलेल्या या समायोजन प्रक्रियेला जिल्हय़ातील शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत चुकीच्या पद्धतीने समायोजन होत असल्याचा आरोप केला होता. बुधवारी दोन ऑगस्टला कणकवली तालुक्यात मोठा गदारोळ झाला होता. शिक्षण विभागाच्या चुकीच्या कार्यपद्धतीबाबत पदाधिकाऱयांनीही नाराजी व्यक्त केली होती.

 दरम्यान, चुकीच्या पद्धतीने होणारे हे समायोजन थांबवावे, यासाठी महाराष्ट्र राज्य
प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक पदवीधर केंद्रप्रमुख सभेने एकत्र येत मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांची गुरुवारी भेट घेतली.

घिसाडघाईने समुपदेशन

 मुख्याध्यापकानंतरच्या सेवाज्येष्ठ शिक्षकाला अतिरिक्त ठरविण्याच्या शासनपत्राला रत्नागिरी जिल्हय़ातील शिक्षकांच्या रिट पीटिशन सुनावणीत उच्च न्यायालयाने एक ऑगस्टला अंतरिम आदेशाने स्थगिती दिल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय प्रशासनाने वस्तुनिष्ठ पारदर्शी कार्यवाही करता चुकीच्या माहितीवर घिसाडघाईने समूपदेशनाचा घाट घातला गेल्याचा आरोपही करण्यात आला.

यादीतही घोळ

 अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकांच्या याद्या रिक्तपदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचाही समायोजन यादीत समावेश करण्यात आला आहे. आक्षेप नोंदविण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात आली.

 दरम्यान, या समायोजन प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्याचे उत्तर मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत समायोजन प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे संघटना प्रतिनिधींनी सांगितले.

 यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष के. टी. चव्हाण, कास्ट्राईबचे किशोर कदम, केंद्रप्रमुख सभेचे विजय भोगले, राजा कविटकर आदी उपस्थित होते.

Related posts: