|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शनिवारपासून भरता येणार जीएसटी रिटर्न

शनिवारपासून भरता येणार जीएसटी रिटर्न 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

कंपन्यांना 5 ऑगस्टपासून जीएसटांतर्गत पहिला कर रिटर्न भरता येणार आहे. जुलै महिन्याच्या रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 20 ऑगस्ट आहे. पहिल्या दोन महिन्यांसाठी सेल्फ एसेसमेन्ट तत्त्वावर रिटर्न भरता येईल. यासाठी जीएसटीएन नेटवर्कवरील जीएसटीआर 3बी अर्ज भरावा लागेल. हा अर्ज शनिवारपासून उपलब्ध होईल. 25 बँकांबरोबर भागीदारी करण्यात आली असून आरबीआयकडून कर जमा करण्यासाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे असे जीएसटीएन नेटवर्कचे सीईओ नवीन कुमार यांनी सांगितले.

Related posts: