|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कवठेएकंदमध्ये शालेय विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्त्या

कवठेएकंदमध्ये शालेय विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्त्या 

प्रतिनिधी /तासगाव :

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांने त्याच्याशी जबरदस्तीने झालेल्या अनैसर्गिक कृत्याचे मनास वाईट घेऊन गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. तर याप्रकरणी त्या विद्यार्थ्यांचा मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कवठेएकंद येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली. तर संबंधीत व्यक्तीस ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी कवठेएकंद येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे कवठेएकंद येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील कपील विनायक गुरव वय 16 वर्षे 11 महिने असे आत्महत्या केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे नाव आहे. तर याप्रकरणी त्याचे वडील विनायक तानाजी गुरव रा. कवठेएकंद ता. तासगाव यांनी विलास यशवंत गुरव वय अंदाजे 66 रा. कवठेएकंद ता. तासगाव यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

यामध्ये म्हटले आहे, विलास गुरव हे गावातील मारुती मंदिराचे पाठीमागे राहण्यास असून त्याचे घरी आमचे जाणे येणे होते. तर कपील हा त्याचे घरी अधूनमधून जात होता. 26 जून रोजी रात्री 9 वाजता कपील यास माझे घरी  चल असे म्हणून विलास काका कपील यास घरी घेऊन गेले. दुसऱया दिवशी कपील घरी आला. तर दुसरे दिवशी तो घरी झोपताना तु विलास काकाचे घरी जात नाहीस काय विचारले असता त्याने माझी तब्येत बिघडली आहे असे सांगितले.

28 जून रोजी कपील याने पोटात दुखत आहे, मला खूप त्रास होत आहे असे सांगितले तेव्हा मी त्याला दोन दिवस झाले तु मला का सांगितले नाही असे विचारले असता त्याने सांगितले, विलास याच्या घरी 26 जून रोजी मी झोपणेस गेलो. नंतर रात्रीचे वेळी ते माझ्याशी जवळीक करायला लागले तेव्हा मी ओरडलो असता त्यांनी माझे तोंड दाबून धरले व माझे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले.

Related posts: