|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » …तर राजीनामा देईन : प्रकाश मेहता

…तर राजीनामा देईन : प्रकाश मेहता 

ऑनलाइन टीम / मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर राजीनामा देण्यास सांगितले तर मी पदावरुन दूर होईन, असे राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून त्यांच्या निलंबनाची सातत्याने मागणी केली जात आहे. त्यानंतर मेहता यांनी हे स्पष्टीकरण दिले.

एसआरए आणि म्हाडाच्या भूखंडप्रकरणी मेहतांच्या अडचणी वाढत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे. यावर ते म्हणाले, माझ्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात पक्ष अथवा मुख्यमंत्र्यांनी कोणतेही स्पष्टीकरण मागितले नाही. याशिवाय शपथपत्रात मी कोणतीही माहिती लपवलेली नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास मी पदावरुन दूर होईन, असे मेहता म्हणाले.

Related posts: