|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चंदगड येथे स्कॉलरशिपमित्र पुस्तिकेचे शानदार प्रकाशन

चंदगड येथे स्कॉलरशिपमित्र पुस्तिकेचे शानदार प्रकाशन 

प्रतिनिधी/ चंदगड

दै. तरूण भारतने सामाजिक बाधिलकीतून स्कॉलरशिप मित्र पुस्तिकेचा स्तुत्य उपक्रम सुरू केला असून त्याचे प्रकाशन चंदगड येथील कन्या विद्या मंदिरमध्ये झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शामराव कुंभार होते.

स्वागत अवधूत भोसले यांनी केले. विनायक प्रधान यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेऊन शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमात शाळेने जिल्हय़ात अव्वलस्थान मिळविल्याचे स्पष्ट केले. दै. तरूण भारतचे चंदगड तालुका प्रतिनिधी विजयकुमार दळवी यांनी स्कॉलरशिप मित्र हा दै. तरूण भारतने गेल्यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी चालविलेला विशेष उपक्रम असून या पुस्तिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. दर शनिवारी प्रसिध्द होणाऱया चॅम्पियन पुरवणीतून विद्यार्थ्यांना संवेदनशील बनविण्याबरोबरच संपूर्ण जगाची माहिती त्यांना मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. चंदगड तालुक्यात सर्व प्रथम प्राथमिक शाळा सुरू करण्याचे काम दै. तरूण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर यांनी केले आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे सुरू आहे. त्यातूनच एसएससी मित्र, स्कॉलरशिप मित्र, चॅम्पियन अशा पुरवण्या दै. तरूण भारतने सुरू केलेल्या आहेत. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विजयकुमार दळवी पुढे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. शाळेच्या वाचनालयातील बालवाङमय वाचून काढलं पाहिजे. पुस्तकाचे सामुदायिक वाचन करून त्यावर संवाद घडला पाहिजे. कोणत्याही पुस्तकातून संस्काराची पेरणी होत असते. वाचनातून आणि संस्कारातून संवेदनशीशल पिढी घडत असते. तोच धागा पकडून केवळ विद्यार्थी डोळय़ासमोर ठेवून चॅम्पियन पुरवणीची संकल्पना आहे. दररोजच्या वृत्तपत्रातील संपादकीय पान वाचल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिकच भर पडेल. दै. तरूण भारतचा विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद असून समाजाला पुढे नेणारा असल्याचे अध्यक्षीय भाषणात शामराव कुंभार यांनी सांगितले. दै. तरूण भारतच्या उपक्रमांची माहिती विजय शिंगाडे यांनीही दिली. शिष्यवृत्तीचे विद्यार्थी म्हणजे एका वेगळय़ा जहाजाचे प्रवासी असून त्या जहाजाला दिशा देण्याच्या होकायंत्राच्या भूमिकेतून दै. तरूण भारत आपल्या मदतीला आल्याचे अवधूत भोसले यांनी सांगितले. यावेळी निकीता जांभळे आणि राजनंदिनी गावडे या विद्यार्थीनीनी वक्तृत्व केलेची झलक दाखवत मातृऋण फेडले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवंत ठरलेल्या साक्षी पाटील, गायत्री नागरगोजे तर नवोदय परीक्षेत यशस्वी ठरलेल्या सारीका तडवी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी यशवंत डेळेकर, संदीप सबनीस, गजानन मोतेकर, प्रशांत शिंदे, नागोजी बिर्जे, अजय फाटक, शुभांगी पाटील, कविता चंद्रमणी, कविता मेठकुळी, शिवानंद हिटनाळे आदींची उपस्थिती होती. आभार विनायक प्रधान यांनी मानले.

Related posts: