|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आत्ताची मूर्ती ही श्री आंबाबाई आहे हे मान्यच करावे लागेल

आत्ताची मूर्ती ही श्री आंबाबाई आहे हे मान्यच करावे लागेल 

वार्ताहर / यमगे

पुराण, महाकाव्य व इतिहास यामध्ये गल्लत करु नका अन्यथा घोटाळे होतात. भारतातील कोणत्याही शक्तीपीठास लक्ष्मीपीठ असे संबोधले जात नाही. उपलब्ध पुराव्यावरुन आत्ताची मूर्ती ही श्री आंबाबाई आहे हे मान्यच करावे लागेल, असे         प्रतिपादन धर्म उभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष के. देसाई यांनी केले.

मुरगूड ता. कागल येथे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते संतोष पाटील यांनी आयोजित केलेल्या विविध परिवर्तनवादी चळवळी, आंदोलनातील विचारवंत अभ्यासक, सक्रीय कार्यकर्ते, पदाधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते.

डॉ. सुभाष देसाई म्हणाले, विशिष्ट वर्गाच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी करवीरपुराण लिहिले. सत्यनारायण त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी लिहिला. तथाकथीत शिवशाहीरांनी शिवाजी महाराजांवर कादंबरी लिहिली व त्यामध्ये वाट्टेल ते घुसडले. त्यामुळे बुध्दीभेद होऊ देवू नका. सिंहवाहिनी असणाऱया आंबाबाईच्या मस्तकावर नाग, डोक्यावर मातृलिंग आहे व तेथील श्रीचक्र हे शिव पार्वतीच्या संगमातून होते या सुर्यप्रकाशासारख्या स्पष्ट पुराव्यातून मूर्ती श्री आंबाबाईची असल्याचे स्पष्ट आहे. करवीरनिवासिनी हे शक्तीपीठ आहे. भारतातील कोणत्याही शक्तीपिठास लक्ष्मीपीठ असे म्हणतनाहीत. या पिठास शाक्त, शैव परंपरा आहे. मराठा बहुजनांची ही युध्ददेवता शिवपत्नीच आहे. हे ऐतिहासिक तथ्य आहे. या रणरागिनींचे ब्राम्हणीकरण करण्यासाठीच मूर्तीच्या मस्तकावरील चिन्ह पुसण्याचे षडयंत्र झाले हे समजून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार म्हणाले, बहुजनांनी आपली उच्च दर्जाची कृषी संस्कृतीच्या परंपरा जोपासाव्यात ही संस्कृतीच एक स्वावलंबी विचारधारा व सभ्यता आहे. या संस्कृतीस कोणत्याही उसन्या धर्माची आवश्यकता नाही.

बैठकीत मराठा मोर्चा, आरक्षण, शिक्षण याबाबत चर्चा व मनोगते झाली. मराठा बहुजनांनी आपल्या कुटूंबातच विज्ञानवादी दृष्टी, महापुरुषांचा वैचारिक वारसा रुजवावा. मुलांवर विश्वास टाका त्यांच्यावर न्यूनगंडाचा प्रभाव पडता उपयोगी नाही. मराठा बहुजनांनी स्त्रियांना प्रागतिक विचार द्यावेत, केवळ रस्त्यावर वादळे उभी करुन मागण्यान मान्य होत नसतात. त्यासाठी वाटाघाटी, चर्चेसाठी मोर्चांना तेतृत्व असायला हवे. सर्व संघटनांमध्ये मागण्यांच्या बाबतीत एकवाक्यता व आग्रह असावयास हवा. शेतकऱयांच्या एका आंदोलनातून जे साध्य झाले ते तीस तीस लाखांच्या मराठी मोर्चातून साध्य झाले नाही. मराठय़ांना एकाकी पाडण्याचे षडयंत्र यशस्वी झाले. औरंगाबादच्या मोर्चात प्रतिगामी शक्ती शिरल्या मोर्चाच्या मूळ मागणीस बगल देऊन ऍट्रॉसिटीचीमागणी पुढे करण्यात आली. आरक्षणाचा मुद्दा मागे ठेवण्यात आला. मोर्चाला नेतृत्व हवे, चेहराही पाहिजे व आता मोर्चास आवाज हवा. मूक मोर्चाने मागण्या मान्य होत नाहीत अशा भावना पुरोगामी संघटनेच्या विचारवंत, कार्यकर्ते व पदाधिकाऱयांच्या विशेष बैठकीत व्यक्त करण्यात आले.

इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत म्हणाले, मराठय़ांच्या 58 मोर्चातून फलश्रुती काय याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. मराठय़ांचे सामाजिक मागासलेपण सिध्द करण्यासाठी शासनाने एक कणही प्रयत्न केला नाही. डॉ. राजीव चव्हाण म्हणाले, ऍट्रॉसिटीचा मुद्दा पुढे आणून मराठी क्रांती मोर्चाच्यानिमित्ताने होणाऱया मराठा बहुजनांच्या अभूतपूर्व एकीस खीळ घालण्यात प्रतिगामी यशस्वी झाले. अभ्यासकांनी 89 पुरावे मिळवले पण त्याकडे लक्ष देण्याची भूमिका शासनाची नाही.

मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक म्हणाले, केवळ रस्त्यावर वादळ करुन हाती काही लागलं नाही ही बाब समाजास डिप्रेशनमध्ये नेणारी आहे. स्वजातीच्या पुढे दोन पावले जाऊन संघटना उभी करावी. 40 लाखाच्या मोर्चाना नेताच नसेल तर उद्देश कसा साध्य होईल, असाही त्यांनी सवाल उपस्थित केला. यावेळी बाबा महाडिक, डॉ. राजीव चव्हाण, हिंदुराव हुजरे पाटील, संजय घोडके, इंद्रजित घाटगे, सचिन घोरपडे, ऍड. पाटोळे, एम. टी. सामंत, रवींद्र कांबळे, अमर सणगर, एम. डी. रावण, विजय सापळे, शिवाजी कांबळे आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

स्वागत व प्रास्ताविक संतोष भोसले यांनी केले. आभार जोतीराम सुर्यवंशी यांनी मानले. बैठकीस मराठा बहुजनवादी संघटनांचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related posts: