|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कालव्यात पाणी सोडण्यासाठी कवलगुड येथे रास्तारोको

कालव्यात पाणी सोडण्यासाठी कवलगुड येथे रास्तारोको 

वार्ताहर/ अथणी

ऐनापूर पाणी योजनेद्वारे कालव्यात पाणी सोडावे या मागणीसाठी अथणी-कागवाड राज्यमार्गावर कवलगुड येथे शेकडो शेतकऱयांनी रास्तारोको केला. तीन तास केलेल्या या रास्तारोकोमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. तहसीलदार आर. उमादेवी व पाणी योजना अधिकारी गंगाधर बुर्ली यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यांतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कृष्णा नदीस पाणी आले असतानाही सिद्धेवाडी, मदभावी, कवलगुड येथील कॅनॉलला पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे पाणी द्या अशी एकमेव मागणी शेतकरी करत होते. या आंदोलनाचे नेतृत्त्व सिद्धेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष परशराम ऐवाळे, संजय व्हनखंडे, सुनील माने, संजय भोसले यांनी केले.

आंदोलनास युवा नेते श्रीनिवास पाटील यांनी भेट देऊन, पाण्याच्या मोटारी सुरू करा. कॅनॉलला पाणी देण्याची सोय करावी अन्यथा 9 ऑगस्ट रोजी बेमुदत रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा दिला. अधिकारी शेतकऱयांची चेष्टा करत आहेत. शेतकरी एकवेळ पेटून उठला तर गप्प बसणार नाही याची जाण अधिकाऱयांनी घ्यावी, असे सांगितले.

यावेळी अमरेश्वर महाराज म्हणाले, शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकरी सुखी झाला तरच देश सुखी होणार आहे. शेतकरी आपल्या हक्काचे पाणी मागत आहे. सरकारने त्याची व्यवस्था करावी, असे सांगितले.

यावेळी आर. एम. पाटील, श्रीशैल तुगशेट्टी, ईश्वर कुंभारे, मुरग्याप्पा मगदूम, रावसाहेब काळेली, महादेव माळी, निंगाप्पा काळेली, राजू माणगावे, संजय भोसले, शैलेश माणगावे, रमेश वाघमोडे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Related posts: