|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात परिसरात भक्तीभावाने वरदमहालक्ष्मी पूजा

शहरात परिसरात भक्तीभावाने वरदमहालक्ष्मी पूजा 

बेळगाव/प्रतिनिधी

श्रावण महिन्यात मंगळागौरीपासून विविध सणांना सुरुवात होते. यावेळी अनेक देवदेवतांची पूजाअर्चा केली जाते. वरदमहालक्ष्मी पूजा ही यातील एक महत्त्वाची पूजा मानण्यात येते. शुक्रवारी शहरात ही पूजा मोठय़ा भक्तीभावाने करण्यात आली.

पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारात महिलावर्गाने गर्दी केल्याने बाजार फुलून गेला होता. यादिवशी गौरी-लक्ष्मी म्हणजेच वरदमहालक्ष्मी पूजन बरोबरच लक्ष्मी-नारायणाच्या प्रतिमांचेही विविध ठिकाणी पूजन करण्यात आले. देवीचे विविध प्रकारचे मुखवटे व कलशांवर फुलांची आकर्षक आरास करून भक्तीभावाने ही पूजा करण्यात आली.

देवतांच्या पूजेसाठी पौरोहित्य करणाऱया गुरुजींनाही आमंत्रित करून त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यासाठी महिलावर्ग व यजमानांची लगबग सुरू होती. बेंगळूर, दावणगेरे या भागात वरदमहालक्ष्मीची मोठय़ा प्रमाणावर यथासांग पूजा करण्याची पद्धत पूर्वापार सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून बेळगावमध्येही वरदमहालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. या पूजेमुळे घरात व परिसरात सुख-समृद्धी येते, शांतता नांदते व रोगराई नष्ट होते, असा समज आहे.

Related posts: