|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » आता लवासाची चौकशी होणार

आता लवासाची चौकशी होणार 

ऑनलाइन टीम / मुंबई :

पुण्यातील ‘लावासा’ची चौकशी होणार आहे. येत्या तीन महिन्यात ‘लवासा’ची चौकशी केली जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली आहे. पीएमआरडीएकडून चौकशी केली जाणार आहे.

‘लावासा सिटीमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. पर्यावरणाला हानिकारक ठारणारे काम लावासात आहे, तरीही कारवाई का केली नाही?अशी विचारणा भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी केली होती. त्यावेळी, ‘लवासामुळे पर्यावरणाला हानी झाल्याचे निदर्शनास आले नाही, त्यामुळे कारवाई करण्यात आली नाही, असे उत्तर तापकीर यांच्या प्रश्नाला देण्यात आले. मात्र आमदार भीमराव तापकीय यांनी पुन्हा विधानसभेत सांगितले की, लावासामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य सरकारने 2008 साली लवासा सिटीसाठी विशेष नियोजन प्रधिकरणाचा दर्जा दिला. त्यातील बांधकांमाविषयक नियमालवलीनुसार पर्यावरणाचे निकष पूर्ण करणारी बांधकामे लवासात करण्यात आली आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी सांगितले.