|Monday, April 22, 2019
You are here: Home » भविष्य » भविष्य

भविष्य 

6 ते 12 ऑगस्ट 2017

मेष

चंद्र, बुध प्रतियुती व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कामाला गती मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. जिद्द व मेहनत करूनच तुमचे प्रश्न सुटतील. कोर्टकेसमध्ये बेसावध राहू नका. राजकीय-सामाजिक कार्यात चर्चा सफल होईल. संघटन करण्यात सर्वांचे सहकार्य मिळेल. लोकप्रियता मिळेल. तुमचे डावपेच सहजच यशस्वी होतील, असे समजू नका. परंतु कार्य करत रहा. संधी मिळेल. व्यवसायात सुधारणा होईल. संसारातील तणाव व समस्या सावरुन घेता येईल.


वृषभ

सूर्य, गुरु लाभयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. जास्त महत्त्वाची कामे या सप्ताहात पूर्ण करा. सर्वांचे सहकार्य मिळेल. संसारातील तणाव अथवा कोर्टकेस असल्यास ती पूर्णपणे मिटवा. पुढे अडचणी वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गती मिळेल. वरि÷ांचे सहकार्य मिळेल. धंद्यात जम बसेल. नवे कंत्राट मिळवा. थकबाकी वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात मोठी संधी मिळेल. प्रगतीकारक कोणतीही  संधी सोडू नका. शिक्षणात यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.


मिथुन

बुध, शुक्र लाभयोग व सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. रविवार, सोमवार अडचणी येतील. त्यानंतर मात्र तुमचे काम होईल. नोकरीत वरि÷ांना खूष ठेवता येईल. वर्चस्व वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकप्रियता वाढेल. विरोधकांना थोपवता येईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. संसारात आनंदी वातावरण राहील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. धंदा वाढेल. लक्ष द्या. कोर्टकेसमध्ये आशा वाढतील.


कर्क

चंद्र, बुध प्रतियुती व सूर्य गुरु लाभयोग होत आहे. तुमच्या कामातील अडचणी कमी होतील. वर्चस्व सर्वच ठिकाणी वाढेल. आप्तेष्ट, मित्र व सहकारी यांच्याबरोबर बुधवार, गुरुवार तणाव होईल. गैरसमज वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात झालेला वाद मिटवता येईल. तुमचे मुद्दे वरि÷ांना पटवून देता येतील. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. धार्मिक व्यवहार सावधपणे करा. कला, क्रीडा, साहित्यात तुमचे महत्त्व टिकून राहील. परंतु आपसात मन कलूषित होण्याची शक्मयता आहे. प्रेमात तणाव होईल. धंद्यातील नफा वाढेल.


सिंह

मंगळ,  नेपच्यून षडाष्टयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. अहंकार व अरेरावी केल्यास कामातील अडचणी वाढतील. तडजोडीचे धोरण ठेवा. राग वाढेल, संयम ठेवा, राजकीय-सामाजिक कार्यात आरोप येतील. तारेवरची कसरत करावी लागेल. लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न करू शकाल. धंद्यात वर्चस्व राहील. फायदा मिळेल. नोकरीत कामात चूक होऊ शकते. वरि÷ांच्या बरोबर वाद संभवतो. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या.


कन्या

वेळ, प्रसंग पाहून बोला; नाहीतर सर्व ठीक चालले असताना अचानक तुमचे वक्तव्य तणाव निर्माण करेल. सूर्य, गुरु लाभयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात बुधवार, गुरुवार गैरसमज होईल. धंद्यात समस्या येतील. कामगार कमी होतील. वाद वाढवू नका. धंदा मिळेल. संसारात मुलांच्या सुखासाठी प्रयत्न कराल. खूषखबर मिळेल. भेटीगाठी होतील. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कोर्टकेसमध्ये प्रगती होईल. जमीन खरेदीत फायदा होईल.


तूळ

चंद्र, बुध प्रतियुती व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. साडेसातीचा शेवटचा लहानसा टप्पा राहिला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. धंद्यात वाढ झाल्याने उत्साह राहील. आप्तेष्ट, मित्र यांचा सहवास घडेल. मोठय़ा लोकांचा परिचय होईल. मान-प्रति÷ा मिळेल. राजकीय-सामाजिक  कार्यात आत्मविश्वासाने काम करता येईल. आशादायक परिस्थिती कोर्टकेसमध्ये दिसेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायी घटना घडेल. शिक्षणात कष्टाने यश खेचून आणता येईल. संसारात तणाव कमी होईल.


वृश्चिक

सूर्य-गुरु लाभयोग व चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे करण्यात यश मिळेल. खाण्याची काळजी घ्या. नातलग, मित्र यांच्या मदतीला जावे लागेल. अनाठायी खर्च टाळा. कुटुंबात कामाचा व्याप वाढेल. पाहुणे येतील. धंद्यात लक्ष द्या. नवे काम मिळेल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. तणाव व वाद कोणत्याही क्षेत्रातील असो लवकर संपवा. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. आळसाने नुकसान करून घेऊ नका.


धनु

सूर्य, प्लुटो षडाष्टकयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. स्वत:च्या  आत्मविश्वासावर कठीण प्रसंगातून मार्ग शोधता येईल. जवळचे लोक मदत करतील. नोकरीत काम वाढेल. नाराजी होईल. राजकीय- सामाजिक कार्यात आरोप येतील. टीका होईल. तुमच्या हेकेखोर स्वभावावर ताशेरे ओढले जातील. संयम ठेवा. कोर्टकेसमध्ये सावध रहा. पुढची तारीख घ्या. धंद्यात सुधारणा होईल. प्रेमाला चालना मिळेल. प्रेमाच्या व्यक्तीला दुखवू नका.


मकर

स्वत:च्या हिमतीवर कामे करून घेता येतील. कठोर शब्द प्रयोग करू नका. तुमचे वर्चस्व वाढेल.  धंद्यात मात्र खर्च वाढेल. समस्या येतील. कामगारांच्या तक्रारी वाढतील. कुटुंबात आपसातील मतभेद सोडवावे लागतील. राजकीय- सामाजिक क्षेत्रात सहकारी फारसा आपलेपणा दाखवणार नाहीत. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. चांगली संधी गमवू नका. कोर्टाच्या कामात आशा वाढतील. आर्थिक व्यवहार जपून करा.


कुंभ

सूर्य, चंद्र षडाष्टक योग व बुध शुक्र लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार तणाव वाढेल. गैरसमज होईल. सामाजिक कार्यात अडथळे येतील. राजकीय क्षेत्रात अपमानास्पद घटना घडण्याची शक्मयता आहे. वरि÷ तुमच्यावर आरोप करतील. दुर्लक्ष झाल्याचे सांगतील. नोकरीत जास्त कष्ट पडतील व तणाव राहील. धंद्यात चांगली सुधारणा होऊ शकेल. नातलग, घरातील माणसे तुमच्या मदतीला येतील. मनावरील ताण त्यामुळे कमी होईल.


मीन

चंद्र, शनि लाभयोग व चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. बुधवार, गुरुवार तुमचे कठोर बोलणे धंद्यात अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे. संयम ठेवा. मैत्रीने कामे लवकर होतात. कुटुंबात वर्चस्व राहील. तुमचे कौतुक होईल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव दिसेल. पुरस्कार व  आर्थिक लाभ मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. जुनावाद अथवा कोर्टकेस असल्यास मिटवा.


 

Related posts: