|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमरावतीमध्ये जागतिक दर्जाचे ‘बिझनेस स्कूल’

अमरावतीमध्ये जागतिक दर्जाचे ‘बिझनेस स्कूल’ 

चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारची तयारी : 500 कोटी रुपयांचा येणार खर्च

वृत्तसंस्था / विशाखापट्टणम

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी), हैदराबादसारखी जागतिक दर्जाची संस्था निर्माण करण्याची योजना आखत आहेत. त्यांनीच हैदराबादला जागतिक माहिती-तंत्रज्ञान केंद्र बनविले होते, जे आंध्रप्रदेशच्या विभाजनानंतर तेलंगणाच्या वाटय़ाला गेले. आता नायडूंचे सरकार अमरावतीमध्ये पब्लिकöप्रायव्हेट पार्टनरशिप पद्धतीवर या संस्थेच्या स्थापनेचे ब्ल्यूप्रिंट तयार करण्यासाठी कार्यरत आहे.

अमरावतीमध्ये या संस्थेला 500 कोटी रुपयांच्या खर्चाने 100 एकरच्या जागेत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी जगातील प्रख्यात शैक्षणिक संस्था लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, हार्वर्ड केनेडी स्कूल, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरसह युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम आणि ग्लोबल कॉर्पोरेट वर्ल्डची मदत घेण्याची योजना तयार केली जातेय. संयुक्त राष्ट्राच्या इतर संस्था म्हणजेच जागतिक बँक, एडीबी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशनला देखील प्रकल्पाचा जागतिक भागीदार बनविण्याचा विचार केला जातोय.

प्रस्तावित संस्थेचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त आंध्रचे माजी सचिव एस.पी. टकर यांनी 10 किंवा त्यापेक्षा अधिक उद्योग भागीदार आपल्या सीएसआर अंतर्गत 50-50 कोटी रुपयांचे योगदान देतील आणि ते प्रशासकीय मंडळाचा हिस्सा असतील अशी माहिती दिली.

या प्रकल्पाची धुरा आयएसबीचे संस्थापक डीन आणि अशोका विद्यापीठाचे सह-संस्थापक प्रमथ राज सिन्हा यांना सोपविली जाईल. आम्ही या विषयी सिन्हा यांच्याशी चर्चा केली असून संस्थेचे संचालक आणि सल्लागार होण्याची त्यांनी तयारी दर्शविली. आम्ही लवकरच कामकाजाची एक व्यवस्था तयार करू असे टकर म्हणाले.

Related posts: