|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » होनेवाडी काजू चोरीप्रकरणी मुख्य आरोपीसह सर्व गजाआड

होनेवाडी काजू चोरीप्रकरणी मुख्य आरोपीसह सर्व गजाआड 

प्रतिनिधी/ आजरा

होनेवाडी (ता. आजरा) येथील विकास फळणेकर यांच्या मालकीच्या फळणेकर कँश्यू इंडस्ट्रीजमधील गोडावून काजू बी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी व सूत्रधार यांना आजरा प्रथमवर्ग न्यायाधीशांसमोर हजर केले असता आरोपींचा जामीन नामंजूर करण्यात आला. सर्वांना कोठडी ठोठावण्यात आली असून त्यांची रवानगी कोल्हापूर कारागृहात करण्यात आली आहे.

या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी व सूत्रधार नामदेव रामू शेंडे (होनेवाडी), चंद्रकांत आंबाजी सांबरेकर (चितळे), मनोहर वसंत कांबळे (कबनूर) यांना चार दिवसांपूर्वी आजरा पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता यातील सहआरोपी मनोज मोहन खांडेकर (वय 31), राहुल अरुण कानिटकर (वय 31), अमोल सुकुमार कामत (वय 24), उत्तम सदाशिव कांबळे (वय 32), अमित मारुती कांबळे (वय 28), सुभाष उर्फ धिरज सदाशिव कांबळे (वय 30), सुदर्शन उर्फ पिंटू दिनकर सावंत (वय 30), (सर्व रा. सिद्धार्थनगर कबनूर ता. हातकणगले) या आरोपीना अटक करून गुन्हय़ातील चोरीला गेलेल्या मालाची प्रत्येकी 50 किलो वजनाची 163 काजू बियांची पोती तसेच आरोपीनी गुन्हय़ात वापरलेल्या मोटरसायकली वाहन, टेम्पो व साहित्य मुद्देमालासह जप्त करण्यात आलेले आहे. शनिवारी सर्व सहभागी आरोपीना आजरा प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्यासमोर उभे करून गुन्हय़ाची कबुली घेतली. आरोपींचा यावेळचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला असून सर्व आरोपींची रवानगी कोल्हापूर कारागृहात करण्यात आली आहे.

सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर अधीक्षक दिनेश बारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, सहाय्यक फौजदार बी. एस कोचरगी, हेड कॉन्स्टेबल रावसाहेब कसेकर, पोलीस नाईक गणेश हांगे, प्रशांत सुतार, दिगंबर सुतार, राजकुमार पाटील, चालक नाथा पाटील, राजू पताडे यांच्या सहकार्याने गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गवारी व तपास पथक करीत आहे.