|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तामिळनाडूच्या व्यापाऱयांकडून कांदा व्यापाऱयाची 35 लाखाला फसवणूक

तामिळनाडूच्या व्यापाऱयांकडून कांदा व्यापाऱयाची 35 लाखाला फसवणूक 

प्रतिनिधी/ सोलापूर

तामिळनाडूच्या चार व्यापाऱयांनी सोलापूर येथील कांदा व्यापाऱयाला 35 लाख रूपयाला फसविले आहे. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. के. बी. संगसिड (रा. इरोद, तामिळनाडू), अ. शिवकुमार, जय अनंती, ब. राजु यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नागनाथ धर्माण्णा जावळे (वय 52, रा. सरस्वती नगर, शेळगी) यांनी फिर्याद दिली.

नागनाथ जावळे हे मार्केड यार्डमध्ये कांद्याचे व्यापारी आहेत. वरील या चारही आरोपींचा फिर्यादीशी चार ते पाच वर्षांपासून संबंध आहेत. त्यामुळे कांदा व्यापारी जावळे यांचा आरोपींवर विश्वास संपादन केला. त्यानंतर 2016 सालापासून  वेळोवेळी मोठय़ाप्रमाणात जावळे यांच्याकडून कांदे मागवून घेतले. ही उधारीची रक्कम 35 लाखांपर्यंत झाल्याने जावळे यांनी पैशाची मागणी केली. पण आरोपींनी वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ केली. त्यानंतर स्वतः जावळे हे तामिळनाडू येथे जाऊन पैशाची मागणी केले असता त्यांना आरोपींनी शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यामुळे घाबरून फिर्यादी तसेच सोलापूरला आले.

काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा तामिळनाडूला फोन करून पैसे विचारले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी नागनाथ जावळे यांनी जेलरोड पोलीस ठाणे येथे आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सदर घटनेची शहानिशा करून तामिळनाडूतील चारही जणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस शिपाई बनकर हे करीत असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: