|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » डबल सीटच्यानंतर समीर म्हणतोय मला काहीच प्रॉब्लेम नाही

डबल सीटच्यानंतर समीर म्हणतोय मला काहीच प्रॉब्लेम नाही 

टाईमप्लीज, डबलसीट यांसारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटसफष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक समीर विद्वांस याच्या वायझेड या वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटाने देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कौटुंबिक आणि सर्वसामान्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित घडामोडींवर देखील इतके सुंदर चित्रपट होऊ शकतात याची झलक समीरचे चित्रपट बघताना येते. बिनधास्त म्हणा मी वायझेड आहे असे सांगणारा समीर आता बिनधास्त मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणायला सज्ज झालेला आहे.

एका चांगल्या दिग्दर्शकाची नजर आणि त्याची निवड तीक्ष्ण असते म्हणतात ते समीरच्या बाबतीत अगदी खरं आहे. चित्रपटाचा विषय असो वा चित्रपटाची कास्ट प्रत्येक गोष्टीत त्याचे परफेक्शन दिसून येते. आजवर त्याने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटाचे विषय आणि टाईम प्लीज मधील प्रिया बापट-उमेश कामतची जोडी, डबल सीटमधील मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरीची जोडी आणि आता समीरच्या आगामी चित्रपटातील स्पफहा जोशी आणि गश्मीर महाजनी यांची जोडी यांना इतर कशाचीच सर नाही. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाद्वारे स्पफहा जोशी आणि गश्मीर महाजनी ही नवीन जोडी प्रथमच आपल्या समोर येत आहे. त्यांच्याबरोबरच निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम, मंगल पेंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, मास्टर आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर, विनोद लव्हेकर व सतीश आळेकर यासारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा, रवि सिंग यांच्या फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित समीर, स्पफहा आणि गश्मीर या त्रिकुटाचा ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

Related posts: