|Thursday, April 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » चंद्रकांत कुलकर्णी आणि डॉ. विवेक बेळे प्रथमच एकत्र

चंद्रकांत कुलकर्णी आणि डॉ. विवेक बेळे प्रथमच एकत्र 

माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, अलीबाबा आणि चाळिशीतले चोर आदी नाटकांचे लेखक डॉ. विवेक बेळे आणि चारचौघी, वाडा चिरेबंदीपासून ते साखर खाल्लेला माणूसपर्यंत गेली 30 वर्ष सातत्याने दर्जेदार नाटकं देणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी प्रथमच एकत्र येतायत. बेळे यांची नवी कुरकुरीत कॉमेडी कुत्ते कमीने नाटक आत्ता तालमींमध्ये आहे. जिगीषा आणि अष्टविनायक यांची निर्मिती असलेलं हे नाटक ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ात रंगभूमीवर अवतरणार आहे. नावापासून कथानकापर्यंत आणि कलाकारांच्या निवडीपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर हे नाटक आपलं वेगळेपण जपणारं ठरेल असं दिसतंय. कुत्ते कमीने! असं कोण कुणाला म्हणतंय? यामागील गुपित गुलदस्त्यात असल्याने रसिकांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वेगळे आकृतीबंध आणि संवादाची खास बेळे स्टाईल आधीच्या नाटकांमधून रसिकांपर्यंत पोहोचलेली आहेच. यावेळी बेळे-कुलकर्णी ही युती नेमके काय घेऊन येतायत? प्रदीप मुळय़े नेपथ्यात काय नवी आयडिया करतील? राहुल रानडेंच्या पार्श्वसंगीत नेमकं काय दडलंय? याविषयीची चर्चा नाटय़वर्तुळात सुरू झालीय.

Related posts: