|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » अभिनेता आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण

अभिनेता आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलीवूड अभिनेता आमीर खानला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमीर खानने स्वतः याबाबतची माहिती दिली.

पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात आमीर खान उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आमीरच्या अनुपस्थितीविषयी चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आमीर खानने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला होता. यावेळी आमीर खानने आपले मनोगत व्यक्त केले. त्याने अभिनेता शाहरुख खानचे विशेष उल्लेख केला. तो म्हणाला, या कार्यक्रमासाठी शाहरुख खान खास माझ्या आग्रहास्तव उपस्थित राहिला.

Related posts: