|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शहरात प्रेंन्डशिप डे उत्साहात

शहरात प्रेंन्डशिप डे उत्साहात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 ‘मी तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवू शकेन का हे माहित नाही. पण तुमच्या अडचणीत मी तुम्हाला एकटे सोडणार नाही हे नक्की.!’ या असे संदेश देत, प्रेंन्डशिप बँन्ड बांधून आणि भेटवस्तू देवून शहरात मैत्रीदिवस उत्साहात पार पडला. याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवून मैत्रीचे नाते घट्ट करण्याचा निर्धार करण्यात आला. 

न्यू कॉलेज, विवेकानंद कॉलेज, महावीर महाविद्याल, कॉमर्स कॉलेज यासह  आदी कॉलेज आणि शहरातील बिंदू चौक, महाद्वार रोड, राजारामपूरी अशा आदी परिसरात युवकांची गर्दी दिसून आली. यामध्ये तरूणाई आपल्या मित्राला प्रेंडशिप बँन्ड बांधण्यात व्यस्त होते. दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांवरून आपल्या मित्र-मैत्रीनिंसोबत सहलीचा आंनद लुटला. तसेच विविध भेटवस्तूंची खरेदीही यावेळी करण्यात आली. तर काहींनी यानिमित्त समाजप्रबोधन आणि समाजजाणीव हा मुद्दा लक्षात घेवून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेटी आणि विविध उपक्रम राबविले.

  यादिनी दिवसभर सोशल मिडीयावर संदेशांची देवाणघेवाण सुरू राहिली. मित्रांचे प्रेम व्यक्त करताना, ‘जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील, कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे नाते हे आज जसे आहे तसेच उद्या राहिल..’ अशा आदी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील संदेश आणि व्हॉट्स ऍपमधून वेगवेगळ्या चिन्हांची देवाणघेवाण करण्यात आली. अनेकांनी मोबाईल संदेश आणि फोन करून आपल्या शुभेच्छा दिल्या.

 ‘पुस्तक प्रेंन्डशिप डे’

मैत्रीदिनानिमत्त आजच्या युवकाने वाचले पाहिजे हा संदेश युवकांपर्यत पोहचविण्याचे काम ‘पुस्तक पेंन्डशिप डे’ असा कार्यक्रम घेवून देण्यात आली. वाचनकट्टा चळवळीतर्फे रविवारी याचे आयोजन करण्यात आले. न्यू कॉलेजमध्ये वाचनाचे फायदे आणि त्यातून मिळणारी भविष्यातील प्रेरणा वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडली.