|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापन

कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापन 

पुलाची शिरोली / वार्ताहर

    रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या ‘मैत्रेय’ या इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ कोल्हापूर पब्लिक स्कूल येथे पार पडला. मैत्रेय हा इंटरॅक्ट क्लब, कोल्हापूर पब्लिक स्कूल येथे 7 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आला आहे. यावर्षीचे नूतन अध्यक्ष सार्थक गुंदेषा व सचिव सिद्धी पाटील यांची निवड करण्यात आली.

     मावळते अध्यक्ष वैभव जाधव व सचिव तनया भाट यांनी वर्षभारत केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. यामध्ये स्वयं मतीमंद मुलांच्या शाळेत, मुलांना चित्रकला, विविध खेळ व नृत्य असे अनेक कार्यक्रम अयोजीत केले. याचबरोबर त्यांच्याकडून आकाशकंदील, गणेशमूर्ती, कापडी फुले तयार अशा अनेक वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात आले. याबरोबर नवराञ उत्सवात महलक्ष्मी मंदिर स्वच्छता व रांगेचे नियोजन, तसेच पल्स पोलिओबद्दल माहिती, वैयक्तिक स्वच्छता, गणेशविसर्जन कचरा संकलन, जवानांसाठी रक्षाबंधन, अशा अनेक उपक्रमांची माहिती देण्यात आली.

    यावेळी विविध कार्याचा आढावा घेऊन या क्लबला जिल्हा पातळीवर बेस्ट इंटरॅक्ट क्लब, बेस्ट इंटरॅक्ट शिक्षक, बेस्ट नृत्य सादरीकरण व बेस्ट विडीओ सादरीकरण असे चार पारितोषक मिळाले असल्याचे सेक्रेटरी गौरी शिरगावकर यांनी सांगितले. तसेच रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या अध्यक्षा विशाखा आपटे यांनी पुढील वर्षी वृद्धांशी मैत्री हा कार्यक्रम तसेच व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा घ्यावी असे सांगितले. त्या करिता क्लबच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

    या कार्यक्रमासाठी आरडीसी इंटरॅक्ट रोटेरीअन हरेश पटेल, दिलीप शेवाळे, शाळेच्या संस्थापिका शोभा तावडे, रोटरी क्लब ऑफ गर्गीजच्या अध्यक्षा विशाखा आपटे, सचिव गौरी शिरगावकर व शाळेच्या मुख्याधापिका शुभांगी पवार, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.