|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘हासन बटाटा’ दाखल

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘हासन बटाटा’ दाखल 

वार्ताहर/ कंग्राळी खुर्द

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हासन बटाटा आवकेला प्रारंभ झाला आहे. शनिवारी टी. एस. पाटील यांच्या दुकानामध्ये तीन ट्रक हासन बटाटा आवक झाली होती. त्याचा भाव 1400 ते 1500 रु. झाला. व्यापारीवर्गाने बटाटा आवकेची पूजा केली व पेढे वाटून नव्याने दाखल झालेल्या बटाटय़ाचे स्वागत केले.

बाजारामध्ये शनिवारच्या दिवशी जवळपास 25 ट्रक बटाटा आवक झाली. त्यामध्ये 17 ट्रक इंदोर, दोन ट्रक हासन तर 6 ट्रक बटाटा आवक डिसा (गुजरात) येथून झाली. बाजारातील बटाटय़ाचे भाव- इंदोर 700 ते 850, डिसा 600 ते 650, हासन गोळा 1400 ते 1500, मध्यम 1200 ते 1250 रु.

भारतात सर्वात जास्त पावसाळी बटाटय़ांची लागवड कर्नाटकातील हासन परिसरात केली जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून बटाटा उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने हासनबरोबरच बेळगाव परिसरात बटाटा लागवड गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून अधिक लागवड कमी झाली आहे. येत्या पंधवरडय़ात हासन बटाटा आवकेला मोठय़ा प्रमाणात प्रारंभ होणार आहे. तर महिन्याभरात बेळगाव बटाटा आवकेला प्रारंभ होणार आहे.      

 

Related posts: