|Saturday, August 24, 2019
You are here: Home » मनोरंजन » नागराजच्या आगामी चित्रपटात बीग बी झळकणार

नागराजच्या आगामी चित्रपटात बीग बी झळकणार 

ऑनलाइन टीम / मुंबई :

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटात महानायक अर्थात अमिताभ बच्चन झळकणार असल्याची माहिती आहे.

‘सैराट’ने गेल्या वर्षी मराठी चित्रपटांचे सर्व विक्रमी मोडीत काढले होते. त्यानंतर या सिनेमाचे तेलगू आणि पंजाबी रिमेकही लवकरच भेटीला येणार आहे. तर निर्माता करण जोहरनेही हिंदी रिमेकसाठी या सिनेमाचे हक्क घेतले आहेत. नागराज मंजुळे यांनी नव्या कथनावर काम सुरू केले आहे. हे कथानक अगोदर मराठीत होते, मात्र ‘सैराट’नंतर नागराज मंजुळे आता हिंदी सिनेमातही पर्दापण करणार आहेत. नागरज मंजुळेंनी या कथेवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम केले आणि अमिताभ बच्चन यांना जानेवारीमध्ये सिनेमाचे कथानक दाखवले. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाला होकार दिला असून या वर्षी अखेरपर्यंत चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे.