|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बस झाडाला आदळली, 32 जण जखमी

बस झाडाला आदळली, 32 जण जखमी 

कणकवली : चालकाचे नियंत्रण सुटल्याने सांगलीहून देवगडच्या दिशेने येणाऱया एस. टी. बसची डाव्या बाजूने रस्त्याकडेच्या झाडावर वेगाने आदळली. या धडकेत बसमधील चालक, वाहकासह 32 जण जखमी झाले. वाहक प्रकाश विश्वनाथ राठोड (30) व प्रवासी गणपत गोविंद पाष्टे (58, बावशी) यांना गंभीर दुखापती झाल्या. हा अपघात फोंडाघाटहवेलीनगर येथील बसथांब्यानजीक सोमवारी दुपारी 1.15 वा. सुमारास घडला.

जखमींना तात्काळ फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. काही जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात, तर दोन्ही गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कणकवली रुग्णालयातील काही जखमींना नंतर खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले.

बस झाडाला आदळली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक संजय नारायण लांबोरे (30) हे देवगड आगाराची सांगलीदेवगड ही एस. टी. बस (एम एच 14 बीटी 3928) घेऊन देवगडच्या दिशेने येत होते. फोंडाघाट हवेलीनगर येथील बसथांब्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटून बसची रस्त्याच्या डाव्या बाजूकडील आंब्याच्या झाडाला धडक बसली. ही धडक एवढी वेगाने होती की, बसच्या दर्शनी भागाची प्रचंड मोडतोड झाली. आतील प्रवासीही पुढील सीटवर आदळल्याने जखमी झाले.

32 जण जखमी

अपघातात सुजित सोनू कदम (54), संतोष सोनू कदम (40, दोन्ही रा. हरकुळ), इरशान गफुर सातवेकर (18, नांदगाव), संगीता महेंद्र परब (35, देवगड), जय महेंद्र परब (13, देवगड), सुलोचना गिरीधर गावडे (60, केळीचीवाडी), निरज रामदास तांबे (16, हसणे), संदीप विलास राणे (19, वाघेरी), विघ्नेश गजानन तेजम (19, वाघेरी), दिनेश मारुती झगडे (35, वाघेरी), दिव्या दिनेश झगडे (27, वाघेरी), मायावती हत्तू तांबे (70, हसणे), हत्तू तांबे (72, हसणे), मंगेश रत्नू तांबे (40, हसणे), दिनेश शिवराम पेडणेकर (45, हसणे), प्रदीप वसंतराव कांबळे (45, वाघेरी), सुशिला वसंत निकम (45, फोंडा), संदीप बळवंत पवार (36, कोल्हापूर), सर्जेराव बंडूपंत कुसाळे (28, राधानगरी), विजय लक्ष्मण गोंधळी (32, निपाणी), संजय नारायण लांबोरे (30, देवगड), प्रकाश विश्वनाथ राठोड (30, निपाणी), संदीप बळवंत पवार (25, देवगड), वैशाली शांताराम सावंत (50, हसणे), प्रदीप शांताराम सावंत (25, हसणे), सुरेखा सुरेश परब (55, सिंधुदुर्ग), गणपत गोविंद पाष्टे (28, बावशी), इमाप हुस्मान नावलेकर (66, नांदगाव), सुदेश राजेंद्र मुंबरकर (21, मिठमुंबरी), इब्राहिम मुहम्मद आंबेकर (78, मिटकेकर), दत्तू रामाराम इबिले (56, राधानगरी), अंकुश दत्ताराम गुरव (35, वाघेरी), आशा अंकुश गुरव (32) हे जखमी झाले.

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बसबाहेर काढत मिळेल त्या वाहनाने फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी बबन हळदिवे, संतोष आग्रे, राजू रावराणे, संतोष रावराणे, भुषण रावराणे, अविनाश सापळे, अजित सापळे, महेश सावंत, राजू मेस्त्राr, अमित नाडकर्णी, दीपक इस्वलकर आदींसह ग्रामस्थांनी मदत केली.

रुग्णालयात तातडीने उपचार

फोंडाघाट आरोग्य आरोग्य केंद्राचे डॉ. सचिन जंगम, डॉ. सुविधा टिकले यांच्यासह खासगी तज्ञ डॉ. बाळकृष्ण करंबेळकर, डॉ. सुभाष कुलकर्णी, डॉ. अशोक गुरव यांनी तातडीने उपचार सुरू केले. यातील किरकोळ जखमी वगळता काही जखमींना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणीही डॉ. नाडकर्णी, डॉ. टाक यांच्यासह नर्स व अन्य कर्मचाऱयांनी जखमींवर तातडीने उपचार केले.

एस. टी. अधिकाऱयांकडून जखमींची भेट

दरम्यान एस. चे. विभाग नियंत्रक चेतन हसबनीस, विभागीय वाहतूक अधीक्षक राजन भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी ए. व्ही. पार्टे, डेपो मॅनेजर अर्चना पाटील, वरिष्ठ लिपीक पी. एस. गोसावी आदींनी रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. सर्व जखमींना मिळून सुमारे 35 हजाराची तातडीची मदत एस. टी. कडून देण्यात आली. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचेही सांगण्यात आले.

समोरील वाहनाने हूल दिल्याने हा अपघात घडल्याचे बसचालक संजय लांबोरे यांनी सांगितले. अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलिसांत नोंद नव्हती.