|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणीत दुचाकीची दुभाजकाला धडक

निपाणीत दुचाकीची दुभाजकाला धडक 

प्रतिनिधी/ निपाणी

दुचाकीची दुभाजकाला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजता येथील लाफायेट हॉस्पीटलनजीक घडली. जीत दीपक वखारिया (वय 20 रा. शिंत्रे कॉलनी, निपाणी) असे गंभीर युवकाचे नाव आहे. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, जीत हा आपली दुचाकी क्र. (केए 22 ईपी 6690) घेऊन नगरपालिकेकडून शिवाजीनगरच्या दिशेने जात होता. दुचाकीचा अधिक वेग असल्याने ताबा सुटून दुभाजकाला जोराची धडक बसली. यामध्ये जीत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या तोंडाला व पायाला दुखापत झाली आहे. तसेच दुभाजकावरील लोखंडी पोल तुटले असून दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच एएसआय एम. जी. निलाखे, हवालदार होलगार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमी जीत याला लाफायेट हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

Related posts: