|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आनंद शिरोडकर यांच्या प्रचाराला सुरुवात

आनंद शिरोडकर यांच्या प्रचाराला सुरुवात 

प्रतिनिधी/ पणजी

 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी पणजी अस्वच्छ केली असून येणाऱया निवडणूकीत त्यांना घरी पाठवून पणजी स्वच्छ करणार आहे, असे अश्वासन यावेळी पणजी गोवा सुरक्षामंचचे उमेदवार आनंद शिरोडकर यांनी दिले. गोवा सुरक्षा मंचच्या  कार्यकर्त्यांनीं काल पणजी मार्केटमध्ये झाडू मारुन प्रचाराला सुरुवात केली, यावेळी गोवा सुरक्षा मंचचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पर्रीकरांसाठी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळेकर यांनी राजीनामा दिला हे राजकारणी आपल्याला हवे तसे लोकांना नाचवतात. त्यांनी पणजीकरांसाठी अनेक आश्वासने दिली होती. पण आश्वासने पूर्ण केलेली नाही. पर्रीकर आपल्या मर्जीनुसार काम करत आहे. त्यांना लोकांचे काहीच पडलेले नाही यावेळी पणजीचे लोक गप्प बसणार नसून पर्रीकरांना यावेळी घरी पाठवणार आहे, असे यावेळी आनंद शिरोडकर यांनी सांगितले.

 पर्रीकरांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाही पणजी स्वच्छ नाही कचऱयाची समस्या वाढत आहे. पार्कीगची समस्या, सांतिनेज नाला तसेच कॅसिनेंची समस्या तशीच आहे. पर्रीकरांनी अनेक आश्वासने दिली पण पूर्ण केली नाही. यावेळी पणजीवासिय त्यांच्या आश्वासनांना भुलणार नाही. या निवडणूकीत पर्रीकरांचा पराभव निच्छित आहे, असे यावेळी अरविंद भाटीकर यांनी सांगितले.

 यावेळी आनंद शिरोडकर यांच्या सोबत मोठय़ा प्रमाणात युवा असून ही युवाच यावेळी त्यांना पणजीतून विजयी करणार आहे. युवा पर्रीकरांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे यावेळी पणजीतील लोक गोवा सुरक्षा मंचच्या उमेदवाराला निवडून आणणार आहे, असे यावेळी हृदयनाथ शिरोडकर यांनी सांगितले.

 यावेळी रोशन सावंत यांनी आनंद शिरोडकर यांना विजयी करुन देण्याचे अवाहन  केले. यानंतर गोवा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी पणजीत रॅली काढली.

Related posts: