|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » मराठा समाजाला ओबीसींप्रमाणेच सवलती : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठा समाजाला ओबीसींप्रमाणेच सवलती : मुख्यमंत्र्यांची घोषणा 

ऑनलाइन टीम / मुंबई :

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात,तेवढय़ाच सवलती आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

605 अभ्याक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. मराठा मोर्चाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिले. मागासवर्गीय आयोगाकडे आपण याचा पाठपुरावा करणार असून ठराविक मुदतीत अहवाल देण्यास मुख्यमंत्री सांगितले. ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज ही योजना आणली जाईल.तसेच दहा रूपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. प्रत्येक जिह्यात हॉस्टेलसाठी पाच कोटी रूपये दिले जाणार आहेत. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्क्यांवर आणली. 605अभ्यासक्रमांमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळणार आहे.

 

Related posts: