|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » सलग तिसऱया सत्रात भांडवली बाजारात घसरण

सलग तिसऱया सत्रात भांडवली बाजारात घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 216, एनएसईचा निफ्टी 70 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

मंगळवारच्या घसरणीनंतर भांडवली बाजार बुधवारी पुन्हा कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.7 टक्क्यांनी घसरत बंद झाले. सलग तिसऱया सत्रात कमजोर झाल्याने निफ्टी 9900 च्या आसपास, तर सेन्सेक्स 32000 च्या खाली पोहोचला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टी 9,893 आणि सेन्सेक्स 31,731 पर्यंत घसरले होते.

बीएसईचा सेन्सेक्स 216 अंशाने घसरत 31,798 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 70 अंशाने कमजोर होत 9,908 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही जोरदार विक्री झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.7 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.7 टक्क्यांनी कमजोर झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.9 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

औषध, वाहन, बँकिंग, एफएमसीजी, मीडिया, भांडवली वस्तू, दूरसंचार, तेल आणि वायू समभागात सर्वात जास्त विक्री झाली. निफ्टीचा औषध निर्देशांक 4 टक्के, वाहन निर्देशांक 1.75 टक्के, खासगी बँक निर्देशांक 1 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.8 टक्के आणि मीडिया निर्देशांक 1.1 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 1.1 टक्के आणि दूरसंचार निर्देशांक 0.8 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.5 टक्क्यांनी कमजोर झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

हिंडाल्को, एनटीपीसी, ओएनजीसी, एशियन पेन्ट्स, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक 2-0.5 टक्क्यांनी वधारले. अरबिंदो फार्मा, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, इंडियाबुल्स हाऊसिंग, सिप्ला, बजाज ऑटो 5.9-2.8 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात बँक ऑफ इंडिया, पेज इन्डस्ट्रीज, हॅवेल्स इंडिया, रिलायन्स कॅपिटल, बजाज होल्डिंग्स 3.8-1.3 टक्क्यांनी वधारले. अदानी एन्टरप्रायजेस, अजंता फार्मा, गोदरेज इन्डस्ट्रीज, डिवीज लॅब आणि बजाज फिनसर्व 9-4.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅपमध्ये इन्सेक्टिसाइट्स, ग्रॉएर ऍण्ड वेल, आयजी पेट्रो, एडेलवाईस, एमएसआर इंडिया 7.5-5 टक्क्यांनी वधारले. गॅमन इन्फ्रा, जेबीएफ इन्डस्ट्रीज, संघवी मुव्हर्स आणि नॅटको फार्मा 19.7-10.7 टक्क्यांनी घसरले.