|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » करेंगे और करके रहेंगे

करेंगे और करके रहेंगे 

‘भारत छोडो’च्या अमृतमहोत्सवा निमित्त लोकसभेत पंतप्रधानांचा निर्धार : सोनिया गांधींनी डागली तोफ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्वातंत्र्य लढय़ात 1942च्या ‘भारत छोडो’ आंदोलनावेळी महात्मा गांधी यांनी देशवासीयांना ‘करो या मरो’ हा मंत्र दिला. आज महात्मा गांधी आपल्यासोबत नाहीत; पण त्याचे विचार आज समस्त देशवासीयांना प्रेरणा देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आमचा मंत्र हा ‘करेंगे और करके रहेंगे’  असा आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘चले जाव’ आंदोलनास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठीची चळवळ एवढी विस्तृत  होईल, अशी कल्पनाही ब्रिटिशानी केली नव्हती. चले जाव आंदोलनावेळी महात्मा गांधींना
ब्रिटीशांनी अटक केली. याच काळात लाल बहादुर शास्त्राr, राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या नेतृत्त्वाचाही जन्म झाला. देशाला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मात्र चले जाव चळवळीमुळे देशातील प्रत्येक नागरिक स्वातंत्र्य चळवळीशी जोडला गेला. महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘करेंगे या मरेंगे’ या मंत्राशी सर्व देशवासीय जोडले गेले. प्रत्येक व्यक्ती हा नेता झाला होता, असेही त्यांनी नमूद केले. आज ‘चले जाव’ आंदोलनाचे स्मरण ठेवून सव्वाशे कोटी देशवासियांनी एकजुटीने कार्य केल्यास गांधी यांच्या स्वप्नातील भारत
साकारले

   नियमांची मोडतोड हा स्वभाव बनतोय

भ्रष्टाचाररूपी वळवीने संपूर्ण देश पोखरला आहे. आज आपण रोड सिग्लन तोडला तर काही चुकीचे वागलो आहे, असे कोणाला वाटत नाही. रोजच्या व्यवहारातील नियमांचे उल्लंघन करणे व त्याची मोडतोड करणे हा आपला स्वभाव होत आहे, अशी खंतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. प्रत्येक देशवासियांनी आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव असावी, असे आवाहनही त्यांनी केले.

2022पर्यंत ‘भ्रष्टाचार मुक्त’ भारतचा संकल्प

वस्तु व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी ही सभागृहातील प्रत्येक सदस्याचे यश आहे. जगासमोर आपण नवीन योजनेच्या अंमलबजावणीचे उदाहरण ठेवले आहे. आता 2022मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देश
भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

सोनिया गांधींचा संघासह केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘चले जावो’ चवळवळीला देशातील काही संघटनांनी विरोध केला होता. त्यांचा स्वातंत्र चळवळीमध्ये कोणत्याही सहभाग नव्हता. आजही अशा संघटनांकडून देशभरात द्वेषाचे आणि तोडफोडीचे राजकारण केले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आज देशभरात धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. सामाजिक द्वेष वाढवून तोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी अशा शक्तींचा विरोध करण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी थेट नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजप व संघावर टीका केली.