|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कृषि उत्पन्न बाजार समिती झाली स्मार्ट

कृषि उत्पन्न बाजार समिती झाली स्मार्ट 

पंढरपूर / प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचा नारा दिला होता. त्यानंतर आता देशातील गावचावडीपर्यत इंटरनेट पोहचून सारेच स्मार्ट होत होते. यामधेच आता शेतक-यांच्या हक्कांच्या शेतमालांला भाव मिळवून देणारी कृषि उत्पन्न बाजार समिती देखिल ‘ स्मार्ट ’ झाली आहे. कारण गेल्या काही दिवसापासून बाजार समितीमधील अनेक व्यवहार हे संगणकीय पध्दतीने झालेले दिसून येत आहे.

   येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्वच व्यवहार हे ऑनलाइन करण्यास सुरूवात झालेली आहे. यामधेही अनेक शेतीमालांचे व्यवहार हे संगणकाव्दारे होणार आहेत. विशेष म्हणजे यांची माहीती देखिल शेतक-यांना आता थेट मोबाईलव्दारे मिळणार आहे. तसेच सदरची माहीती बाजार समितीमधे देखिल आल्यावर शेतक-यांना कळावी. याकरिंता बाजार समितीच्या आवारात अनेक ठिकाणी मोठामोठे स्क्रिनिंग लावून यावर या लिलावांची तसेच व्यवहारांची माहीती देण्यात येणार आहे.

     गेल्या दोन वर्षापासून सरकार हे कायमच पारदर्शकतेचा नारा देत आलंय. यांचाच एक भाग म्हणून बाजार समितीमधे आल्यावर शेतक-यांची फ्ढसवणूक होउ नये. वजनामधे पारदर्शकता यावी , शेतक-यांला थेट त्यांच्या मालांला भाव मिळावा. तसेच शेतकरी तसेच व्यापारी यांच्यामधील तंटे दूर व्हावेत. तसेच यामधे थेट शेतवöयांचा कुठेही आणि कसल्याही पध्दतीचा तोटा न होउ देता. पारदर्शी कारभारातून शेतीमालांला हमीभाव मिळाला जावा. याकरिंताच ऑनलाइन तथा स्मार्ट पध्दतीचा अवलंब सुरू केलेला आहे.

  विशेष म्हणजे या ऑनलाईन व्यवहारांमुळे आता बाजार समितीच्या आवारात ठिक†िठकाणी संगणक ठेवण्यात आलेले आहे. यामधे शेतक-यांला त्यांच्या व्यवहारांची रितसर पावती मिळणार आहे. यामधे वजन , किंमत यांची योग्य ती नोंद देखिल केली जाणार आहे. तसेच याबाबत खरेदी विक्रीची माहीती देण्यासाठी बाजार समितीच्या आवारामधे तब्बल 20 स्क्रिनिंग देखिल बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रमाणात बाजार समितीच्या कारभारांमधे पारदर्शकता येत. शेतक-यांमधून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

  या स्क्रिनिंगच्या माध्यमातून स्थानिक बाजार समितीच्या खरेदी विक्रीच्या भावासमवेतच इतरही अनेक बाजार समितीमधील भाव देखिल यावर दिसणार आहे. तसेच याबबातची सखोल माहीतीही शेतकरी व आडत्यांना मोबाईलवर मिळणार आहे. याबाबत आडत्यांना येत्या काळात टॅब देखिल दिले जाणार आहेत. तसेच शेतक-यांच्या ऍन्ड्राइड माबईलवर ऍप डाउनलोड केल्यावर देखिल यांची माहीती येणार आहे. यांची सर्व सुत्रे ही बाजार समितीच्या सचिवांकडे राहणार आहेत. त्यामुळे कुठल्याही व्यापा-चाला तसेच राजकारणी अथवा बडया बागायतदारांची आता व्यवहारांमधील होणारी लुडबुड ही थांबली जाणार आहे.

     या ऑनलाईन कारभारांमधे पहील्या टप्यात भुसार पिके घेतली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर पिके देखिल हे ऑनलाईनवर येणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मोठया प्रमाणावर बाजार समितीच्या कारभारांमधे शेतक-यांचे आणि प्रशासन आणि आडतदार यांचे तंट होत होते. मात्र आतार बाजार समिती ही ऑनलाईन झाल्यामुळे हे तंट बंद होउन. आता बाजार समिती ही स्मार्ट होताना दिसून येणार आहे.