|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही? आता सोशल मीडीया सांगणार

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही? आता सोशल मीडीया सांगणार 

ऑनलाइन टीम / वॉशिग्ंटन :

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात की नाही, हे आता फेसबुकवरील पोस्ट किंवा इन्स्टाग्रामवरील फोटोंवरून कळू शकेल. संशोधकांकी एक असा कम्प्युटर प्रोग्राम तयार केले आहे. याद्वारे डॉक्टरांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे डिप्रेसनचा सुगावा लागू शकतो.

या कम्प्युटर प्रोग्रामद्वारे 70 टक्के डिप्रेस्ड लोकांचा शोध घेणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील वर्मोंट विश्वविद्यापीठाच्या क्रिस्टोफर डेनफोर्थ यांच्या माहितीनुसार, ‘सोशल मीडिया ऍपवर काही लोकांच्या अकाऊंटचे विश्लेषण केल्यानंतर आम्हाला असे निदर्शनास आले की, ‘डिप्रेशनमध्ये असलेल्यांचे फोटो गडद रंगांमध्ये असतात. शिवाय त्यांच्या फोटोंवर लोकांनी अधिक कमेंटही केलेल्या असतात. अनेकदा यांमध्ये चेहरी स्पष्ट दिसत नाही’