|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » एसबीआयच्या नफ्यात तिप्पट वाढ

एसबीआयच्या नफ्यात तिप्पट वाढ 

मुंबई

 भारतीय स्टेट बँकेने पहिल्या तिमाहीचा निकाल शुक्रवारी प्रसिद्ध केला. गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत यात तीन पटीने वाढ झाली. अपेक्षेपेक्षा निकाल चांगला राहिला असून लाभांशामध्ये घट झाल्याने नफा वाढला आहे. या दरम्यान बँकेच्या अनुत्पादक कर्जातही मोठी वाढ झाली. यात वाढ झाल्याने एसबीआयचा समभाग शुक्रवारी घसरला. जून तिमाहीत बँकेचा नक्त नफा गेल्या वर्षाच्या 1046 कोटी रुपयांवरून 3032 कोटी रुपयांवर पोहोचला. यामध्ये 190 टक्क्यांनी वाढ झाली. बँकेला 2900 कोटी रुपयांचा नफा होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. गेल्या तिमाहीत बँकेचे अनुत्पादक कर्ज 9.97 टक्क्यांवर पोहोचले. मार्च तिमाहीत एकूण कर्जाच्या तुलनेत ते 6.9 टक्के होते. गेल्या वर्षी हा आकडा 6.94 टक्के होता. बँकेचे अनुत्पादक कर्ज 1.12 लाख कोटी रुपयांवरून 1.88 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या तिमाहीत बँकेच्या व्याज उत्पन्नात 1.8 टक्क्यांनी घट होत 19,323 कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षी हा आकडा 19,673 कोटी रुपये होता.

Related posts: